*कुमारी योगिता ईश्वरराव मराठे माध्यमिक विद्यालय, सरदारनगर येथे शालेय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुमारी योगिता ईश्वरराव मराठे माध्यमिक विद्यालय, सरदारनगर येथे शालेय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न*
*कुमारी योगिता ईश्वरराव मराठे माध्यमिक विद्यालय, सरदारनगर येथे शालेय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न*
तळोदा(प्रतिनिधी):-कुमारी योगिता ईश्वरराव मराठे माध्यमिक विद्यालय, सरदारनगर येथे 5 जानेवारी ते 10 जानेवारी 2026 दरम्यान शालेय स्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे आणि त्यांना सक्रिय जीवनशैलीसाठी प्रेरित करणे, हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे उदघाटन मुख्याध्यापिका श्रीम.पी.डी.मराठे यांच्या हस्ते झाले.या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो-खो, क्रिकेट, पास द बाँटल, आणि यांसारख्या विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा शिक्षक आर. बी.पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. कार्यक्रमासाठी फलक लेखन व रांगोळी कला शिक्षक एस.आर. पवार यांनी केले होते. कार्यक्रमाच्या सांगता समारंभाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद आणि क्रीडा शिक्षक उपस्थित होते. यावेळी बोलताना मान्यवरांनी "खेळामुळे केवळ शारीरिक विकासच होत नाही, तर संघभावना आणि शिस्तही जोपासली जाते" असे विचार व्यक्त केले. विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीसाठी, एस. आय.मगरे, के.एम. खैरनार, डी.एन. देवरे, एस.जे.पावरा, एस.एन.शिरसाठ, श्रीम.आर.ए.कलालशिक्षकेतर कर्मचारी व्ही.एस.शिंदे, डी. एच.तडवी, यांनी परिश्रम घेतले आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.
एकंदरीत, हा क्रीडा महोत्सव अत्यंत यशस्वी ठरला आणि विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.



