*33 व्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.अशोक बागुल यांची निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*33 व्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.अशोक बागुल यांची निवड*
*33 व्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.अशोक बागुल यांची निवड*
नाशिक(प्रतिनिधी):-आदिवासी एकता परिषदेतर्फे आयोजित “33 वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन” हे 13, 14 व 15 जानेवारी 2026 रोजी चैनपूरा, तालुका नेपानगर, जिल्हा बुऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे अस्तित्व, एकता, अस्मिता, सांस्कृतिक वारसा, कला, भाषा, इतिहास तसेच निसर्गाशी असलेले अतूट नाते यांचे संवर्धन व संरक्षण करणे, मानवी मूल्यांचे रक्षण, मानवमुक्ती व प्रकृतिमुक्ती या व्यापक संकल्पनांवर आधारित हे महासंमेलन गेल्या 33 वर्षांपासून सातत्याने आयोजित केले जात आहे.
यावर्षीच्या महासंमेलनाची मुख्य थीम “उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरणाचा मानव व प्रकृतिवर होणारा दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय” अशी असून, या विषयावर विविध सत्रांमधून सखोल चर्चा, मंथन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या 33 व्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनासाठी कार्यक्रम अध्यक्षपदी प्रा. अशोक बागुल (नाशिक) यांची निवड करण्यात आली आहे.



