*नांदेड वाघाळा महानगर पालीकेच्या निवडणुकीचा प्रचार जोमात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नांदेड वाघाळा महानगर पालीकेच्या निवडणुकीचा प्रचार जोमात*
*नांदेड वाघाळा महानगर पालीकेच्या निवडणुकीचा प्रचार जोमात*
नांदेड(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून असलेल्या नांदेड वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक सुरू असून 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराचा धुमधडाका सुरु असल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रतिष्ठापणाला लागली आसल्याचे सांगण्यात येत आहे. कारण येथील महानगर पालीकेचा इतिहास पहाता खा. अशोकराव चव्हाण यांची सत्ता राहीली आहे. मात्र अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्या नंतर त्यांचे होमग्राऊँड असलेल्या नांदेड वाघाळा महानगर पालीकेची निवडणुक त्यांच्या सुक्षम नियोजनाखाली होत असून, येथे खा. अशोक चव्हाण खा. डॉ.अजित गोपछडे यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टी, आ.हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वातील शिवसेना (शिंदे गट), माजी खासदार भास्करराव खतगावकर, आ. प्रतापराव पा. चिखलीकर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) तर खासदार रविंद्र चव्हाण आणि बाळासाहेब आंबेडकर बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व वंचीत बहुजन आघाडी यासह अन्य पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रींगणात उभे आहेत, आणि कॉर्नर बैठकांसह डोरटूडोर प्रचार रंगात आला आहे मात्र ही निवडणुक बहुमताने कोण जिंकणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



