*धुळे जिल्ह्यात निसर्ग प्रेमींचा प्रेरणादायक पुढाकार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*धुळे जिल्ह्यात निसर्ग प्रेमींचा प्रेरणादायक पुढाकार*
*धुळे जिल्ह्यात निसर्ग प्रेमींचा प्रेरणादायक पुढाकार*
धुळे(प्रतिनिधी):-मकर संक्रांती जवळ येत असताना धुळे जिल्ह्यातील वन्यजीव रक्षक दुर्गेश जाधव, वेदांत बहाळकर, हर्षल फुलपगारे, विशाल कांबळे, ओम् शिरसाठ, चेतन कोळी, दुर्गेश कोळी, निखिल शिंदे तुषार पाटील यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी पडताळणी करून सुमारे 11 ते 1200 मीटर नायलॉन मांजा गोळा करून सुरक्षित पद्धतीने जाळून नष्ट केले. या धाडसी आणि जबाबदार कृतीमुळे परिसरात पशुपक्षी व मानवांच्या सुरक्षिततेचा संदेश पसरला आहे. दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात पतंग उडवताना चायनीज,नायलॉन ,ग्लास कोटेड इत्यादी प्रकारचे मांजा वापरले जात असल्या मुळे अनेक गंभीर अपघात घडतात. मांजा अत्यंत धारदार व मजबूत असल्या मुळे, पशू पक्षी व मनुष्यांना गंभीर धोका निर्माण होतो. हे अपघात फारच तीव्र असल्याने, बऱ्याच घटनांमध्ये मांजा मुळे मृत्यू झाल्याच्या नोंदी देखील आहेत.
याच पार्श्वभूमीवर, वन्यजीव रक्षक दुर्गेश जाधव व Snake Rescue Team Morane ह्यांनी परिसरातील विविध भागात जाऊन तपासणी करत नायलॉन मांजा गोळा करून नागरिकांना आवाहन केले असून, त्यांनि मांजाच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करून जमवलेल्या मांजाला सुरक्षित पद्धतीने जाळले. या कृतीमुळे स्पष्ट होते की, फक्त प्रशासनाच्या आदेशाने किंवा कायद्याच्या बंदीने नव्हे, तर व्यक्तीगत जबाबदारी आणि धाडसानेच मोठा बदल घडवता येतो. या प्रेरणादायक कृतीमुळे नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली आसून सणाचा आनंद सुरक्षिततेसह साजरा करण्याचे संदेश पसरले आहेत. निसर्ग प्रेमींचे म्हणणे आहे की ! “नायलॉन मांजा फक्त पतंग उडवण्यासाठीचे साधन नसून, तो पक्षी, प्राणी आणि माणसांच्या जीवावर उठलेला धोका आहे. पशू प्रेमींचा उद्देश्य फक्त समाजाला जागरूत करणे व प्राण्यांचे रक्षण करणे इतकाच आहे. जर कुणी नायलॉन मांजाचा वापर किंवा विक्री करत असल्याचे आढळून आल्यास लगेच प्रशासनाला कळवावे. जागृत राहूनच आपण मोठा बदल घडवू शकतो.”
सरकारने नायलॉन मांजावर पूर्ण बंदी घालली आहे, तरीही काही ठिकाणी दुकानदार अजूनही बेकायदेशीर विक्री करत आहेत.
नागरिकांनी पतंग उडवतांना पर्यावरणपूरक किंवा कापसाने बनलेला धागा वापरावा. या घटनेतून हे स्पष्ट होते की सांगण्यात किंवा आदेशाने नव्हे, तर कृती करूनच बदल घडवता येतो निसर्गप्रेमणींचे, धाडसी आणि जबाबदार पाऊल इतरांसाठी प्रेरणादायक आहे आणि एक स्पष्ट संदेश देते की, छोटा प्रयत्न तरी मोठा बदल घडवतो. मकर संक्रांतीचा सण आनंदाचा असतो, मात्र तो कोणत्याही जीवाच्या किमतीवर नसावा. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीची जाणीव ठेवावी, “आपला प्रयत्न थोडासा असला तरी तो मोठा बदल घडवतो. जागृत राहा, सुरक्षित राहा, आणि इतरांनाही शिकवा. कोणी काही तरी चुकीचे करत असल्यास लगेच प्रशासनाला कळवा. प्राणी, पक्षी आणि मानवांसाठी जबाबदारीने वागा; बदल आपल्याच हातात आहे.”



