*आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली पालिकेत बैठक; अधिकाऱ्यांना केल्या कडक सूचना, विभाग प्रमुखांनी समन्वयातून नागरी हिताच्या कामांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली पालिकेत बैठक; अधिकाऱ्यांना केल्या कडक सूचना, विभाग प्रमुखांनी समन्वयातून नागरी हिताच्या कामांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे*
*आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली पालिकेत बैठक; अधिकाऱ्यांना केल्या कडक सूचना, विभाग प्रमुखांनी समन्वयातून नागरी हिताच्या कामांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नागरिकांच्या समस्या सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे. नगरपालिकेत काम घेऊन आलेल्या सामान्यातील सामान्य नागरिकाच समाधान होईपर्यंत त्याला न्याय देण्याचे काम विभाग प्रमुखांनी करावे. पालिकेत सर्वांनी एकमेकांशी समन्वय साधून टीम वर्कने नागरी हिताच्या कामांकडे लक्ष देणं गरजेचे आहे. विभाग प्रमुखांनी नागरिकांची कामे करतांना काम चुकारपणा अजिबात खपवून घेणार नाही अशी तंबी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
रविवारी सकाळी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पालिकेच्या सभागृहात नगरपालिकेतील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी नागरी हिताला कामांना प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. बैठकीची प्रास्तावना मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केली. प्रशासन, नगररचना, बांधकाम, लेखा, स्वच्छता व आरोग्य, पाणीपुरवठा या विभागातील अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले. पालिकेत सध्या निधीची कमतरता आहे. यासाठी कर संकलनावर भर द्यावा. शहरातील प्रभागांमध्ये कचरा संकलनासाठी गाड्या व्यवस्थित जातात की नाही याची खातरजमा करावी. पाणीपुरवठ्याच्या बाबतीत यापूर्वीच नियोजन करण्यात आले असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक किरण रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी, कुणाल वसावे, कैलास पाटील, प्रेम सोनार, बांधकाम अभियंता गणेश गावित, प्रशासनाधिकारी गावित यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. साधारणता दोन 2 चाललेल्या बैठकीत विभाग प्रमुखांनी होत असलेल्या कामांची माहिती दिली.