*"जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या एनएसएसच्या विशेष हिवाळी शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्न"*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या एनएसएसच्या विशेष हिवाळी शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्न"*
*"जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या एनएसएसच्या विशेष हिवाळी शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्न"*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी.टी. पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाचा विशेष हिवाळी शिबिराचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. अध्यक्षीय मनोगतात क ब चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य तथा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे रघुवंशी यांनी एनएसएसच्या स्वयंसेवकांना शिबिरातल्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत गावातल्या लोकांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर त्यातून सामाजिक जाणीव विकसित होईल. आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पॅरा-मिलिटरी फोर्सचे जवान योगेश शेवाळे यांनी केले त्यांनी देशाच्या सीमेवर्ती भागातल्या सैनिकांचे चित्तथरारक अनुभव सांगत, सैनिकांची देशाच्याप्रती असलेली समर्पणाची भावना, त्याग, निष्ठा, याविषयी विचार मांडले आणि युवकांना सैन्यदलात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ.एम. एस.रघुवंशी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट करत या विभागाच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या वेगवेगळ्या शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. सुनील कुवर यांनी शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकाचा व्यक्तिमत्व विकास होतो असे प्रतिपादन केले. उपप्राचार्य डॉ. संदीप पाटील यांनी शिबिराचे महत्त्व पटवून दिले. या प्रसंगी केवडीपाड्याचे लोकनियुक्त सरपंच सुरेश भोये, पोलीस पाटील राजू बागुल, ग्रामपंचायत अधिकारी विजय पवार, ग्रंथपाल श्रीराम दाऊतखाने यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सुलतान पवार यांनी केले. सूत्रसंचालन सहायक कार्यक्रमाधिकारी प्रा जितेंद्र पाटील यांनी तर आभार प्रदर्शन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ संगिता पिंपरी यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. माधव वाघमारे यांनी केले. शिबिरासाठी मोठ्या संख्येने एनएसएसचे स्वयंसेवक उपस्थित होते.



