*हिंदु धर्मजागृती सभेचा बॅनर, पोस्टर्स, बैठकांचा माध्यमातून प्रसाराला वेग*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हिंदु धर्मजागृती सभेचा बॅनर, पोस्टर्स, बैठकांचा माध्यमातून प्रसाराला वेग*
*हिंदु धर्मजागृती सभेचा बॅनर, पोस्टर्स, बैठकांचा माध्यमातून प्रसाराला वेग*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहर 18 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता श्रॉफ हायस्कूल नंदुरबार येथे विराट हिंदू धर्म जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या प्रसाराला बॅनर, होर्डिंग, पोस्टर्स बैठकांच्या माध्यमातून वेग आला आहे. हिंदु सेवा सहाय्य समितीने विराट हिंदु धर्मसभेचे आयोजन मे महिन्यात केले होते परंतु अवकाळी पावसामुळे त्यावेळी ही सभा स्थगित करण्यात आली होती. स्थगित झालेली सभा आता 18 जानेवारी रविवार रोजी होत आहे. सभेचा ग्रामीण आणि शहरातील विविध भागात बैठकांचा माध्यमातून प्रसार प्रचार करण्यात येत आहे, या बैठकांना तरुण मुलांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे. ग्रामीण आणि शहरी भागात विविध चौक, मंदिरे याठिकाणी पोस्टरचा माध्यमातून स्थानिक हिंदुत्ववादी प्रसारासाठी मेहनत घेत आहे. सोशल मीडियाचा माध्यमातून सभेचे पोस्ट, फोटो, व्हिडीओ सर्वत्र प्रसारित करण्यात येत आहे. सभेचा निमित्ताने संत, महंत, भागवतकार, कीर्तनकार आपले व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून हिंदू समाजाला हिंदू धर्मजागृती सभेला येण्याचे आवाहन करत आहेत. सभेला येण्याचे निमंत्रण विविध क्षेत्रातील मान्यवर हिंदुत्ववादी हिंदू समाज यांना देण्यात येत आहे. विराट हिंदू धर्मजागृती सभेला राष्ट्रीय प्रखर वक्ते कालीपुत्र कालीचरण महाराज येत असून या सभेच्या निमित्ताने हिंदूंचे प्रभावी संघटन करण्याच्या मानस हिंदुत्ववादी यांनी केला आहे. हिंदू धर्मजागृती सभेला मोठ्या संख्येने बंधू- भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदू सेवा सहाय्य समिती केले आहे.



