*गावठी पिस्टल व 3 जिवंत काडतूसांसह एक इसम ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गावठी पिस्टल व 3 जिवंत काडतूसांसह एक इसम ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*
*गावठी पिस्टल व 3 जिवंत काडतूसांसह एक इसम ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-7 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील बालआमराई गावातील इसम नामे दिलीप अर्जुन गावीत हा विनापरवाना गावठी पिस्टल कब्जात बाळगून दहशत निर्माण करीत आहे, अशी खात्रिशीर माहितीचे आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लागलीच पथकास खात्री करुन कारवाईकामी रवाना केले. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील बालआमराई गावात जाऊन संशयिताबद्दल अधिकची माहिती घेऊन बातमीची खात्री करुन पंचासमक्ष संशयिताचे घराच्या समोर जाऊन संशयित दिलीप गावीत असा आवाज देता एक इसम बाहेर आला त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव दिलीप अर्जुन गावीत, वय- 47 वर्षे, रा. बालआमराई, पो. विसरवाडी ता. नवापुर जि. नंदुरबार असे सांगितले. त्यास सदर गोपनिय बातमीच्या अनुषंगाने गावठी पिस्टलबाबत विचारणा करता तो असंबंध्द अशी उत्तरे देऊ लागला. त्यास पथकाने विश्वासात घेऊन विचारपुस करता त्याने सदरचे गावठी पिस्टल हे त्याच्या राहते घराच्या बाजुला लागुन असलेल्या एका शेडच्या सिमेंट पत्र्यावर लपवुन ठेवले असल्याचे सांगुन सदर ठिकाणाहून गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल काढून दिले. सदर पिस्टलची पाहणी करता त्यामध्ये पिवळया धातुचे 3 जिवंत काडतूस असे मिळुन आले. त्याअन्वये आरोपी दिलीप गावीत यास ताब्यात घेण्यात येऊन विसरवाडी पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन 25 सह महा. पोलीस कायदा कलम 37 (1) (3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि विकास गुंजाळ, असई/राकेश वसावे, पोहेका/ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, सचिन वसावे, पोकों/अभिमन्यु गावीत, रामेश्वर चव्हाण यांनी केली आहे.
"अशाप्रकारे अवैधरित्या कोणीही इसम अग्नीशस्त्र अगर धारदार शस्त्रे बाळगत असल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास कळवावी, तसेच आपली ओळख ही गोपनिय ठेवण्यात येईल," असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.



