*राजापूर तालुक्यातील तळवडे येथे आज भव्य मोफत आरोग्य शिबीर,ॲड अपूर्वा सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर तालुक्यातील तळवडे येथे आज भव्य मोफत आरोग्य शिबीर,ॲड अपूर्वा सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन*
*राजापूर तालुक्यातील तळवडे येथे आज भव्य मोफत आरोग्य शिबीर,ॲड अपूर्वा सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन*
पाचल(प्रतिनिधी):-सिध्दीविनायक हाॅस्पीटल कोल्हापूर आणि अपूर्वा किरण सामंत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र करक- कारवली उपकेंद्र तळवडे येथे उद्या शुक्रवार 9 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळात भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्या ॲड अपूर्वा सामंत यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. सिध्दीविनायक हाॅस्पीटल चे हृदयविकार विशेष तज्ञ डॉ चंद्रकांत पाटील रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. या शिबीरात ब्लड शुगर, शारीरिक तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आवश्यक औषधे तसेच हृदयविकार, मधुमेह, छातीत धडधड व दुखणे, धाप लागणे, हाता पायाला मुंग्या, गोळे येणे, आदींची तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत. तरी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन अपूर्वा किरण सामंत फाऊंडेशनच्या वतीने सुरेश ऐनारकर, संदीप बारसकर, युवराज मोरे, सोनू पाथरे यांनी केले आहे.