*रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम*
*रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय, नंदुरबार येथे रस्ता सुरक्षेवर आधारित जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक महेश सहाणे, मोटर वाहन निरक्षक दिवेश उबाले, तसेच नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ.एम. एस.रघुवंशी व महाविद्यालयाचे प्राचार्या व्ही. डी. शेवाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उत्तम जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीट बेल्ट वापर, वेगमर्यादा पाळणे तसेच मद्यप्राशन करून वाहन न चालवण्याचा संदेश दिला. उपस्थित अधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेची शपथ देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व उपस्थितांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण झाली. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी, संस्थेचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, संस्थेचे सचिव यशवंत पाटील व महाविद्यालयाच्या प्राचार्या. वैशाली डी. शेवाळे, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मनःपूर्वक कौतुक केले.



