*नंदुरबारात वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा उत्साहात, संपर्क कार्यालयाचे उद्घाटन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारात वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा उत्साहात, संपर्क कार्यालयाचे उद्घाटन*
*नंदुरबारात वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा उत्साहात, संपर्क कार्यालयाचे उद्घाटन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आज मोठ्या उत्साहात पार पडला. याच वेळी वंचित बहुजन आघाडीच्या नवीन संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून दिशा पिंकी शेख (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा नंदुरबार जिल्हा समन्वयक) या उपस्थित होत्या. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष पावबा भिकन आखाडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुनील दीपक कोळी, महिला आघाडीच्या राणीताई गावित, डी. जी. मोरे देवबा पिंपळे निलेश गुलाले नयन बिल यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील आजी- माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विशाल समुद्रे यांनी केले. मेळाव्यात मार्गदर्शन करताना दिशा पिंकी शेख यांनी संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देत कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले. त्यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. हा मेळावा वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्तारासाठी महत्त्वाचा ठरला असून, आगामी काळात पक्षाच्या कार्याला अधिक गती मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



