*शा.ज नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात आईसाहेब शालिनी जयंत नटावदकर पुण्यस्मरणार्थ कथाकथन स्पर्धा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शा.ज नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात आईसाहेब शालिनी जयंत नटावदकर पुण्यस्मरणार्थ कथाकथन स्पर्धा*
*शा.ज नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात आईसाहेब शालिनी जयंत नटावदकर पुण्यस्मरणार्थ कथाकथन स्पर्धा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शा.ज.नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात 8 जानेवारी 2026 रोजी शालिनी जयंत नटावदकर यांच्या पुण्यस्मरणार्थ कथाकथन स्पर्धा संपन्न झाली. प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक सुनील खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा विभाग प्रमुख मोनिका नेरे, रंजीता वसावे व कविता ठाकरे यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले. या स्पर्धेचे मोठ्या गटाचे परीक्षण सौ.सोनल निंबा बोरसे जि. प. आदर्श शाळा कोठली येथील प्राथमिक शिक्षिका यांनी केले तसेच लहान गटाचे परीक्षण एकलव्य विद्यालयाचे प्राध्यापक देसले यांनी केले. कथाकथन स्पर्धेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. लहान गट
प्रथमक्रमांक : वेदांत नितीन पाटील इयत्ता 1 ली क, द्वितीय क्रमांक वेदिका सुनील पाटील इयत्ता 2 री क, तृतीय क्रमांक श्रेया प्रकाश भिसे इयत्ता 1 ली ब, उत्तेजनार्थ राधा अजय पाडवी
इयत्ता 2 री ब,
मोठा गट प्रथम क्रमांक भार्गवी नितीन पाटील इयत्ता 4 थी ड, द्वितीय क्रमांक जान्हवी निलेश राजपूत इयत्ता ४ थी ड,
तृतीय क्रमांक कार्तिक आशिष पाटील इयत्ता 3 री ब, उत्तेजनार्थ रसिका स्वप्निल
सोनार इयत्ता ४थी अ, उत्तेजनार्थ राजवी राहुल भावसार इयत्ता 3 री ड यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन केले आहे, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.



