*कोकणच्या भावी पिढीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी "गराजलो रे गराजलो" चळवळ सज्ज*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकणच्या भावी पिढीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी "गराजलो रे गराजलो" चळवळ सज्ज*
*कोकणच्या भावी पिढीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी "गराजलो रे गराजलो" चळवळ सज्ज*
मुंबई(प्रतिनिधी):- 'एकच ध्यास, भावी पिढीचा सर्वांगीण विकास' हे ब्रीदवाक्य घेऊन श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था (रजि.) संचलित "गराजलो रे गराजलो" या चळवळीने कोकणातील तरुणाईला दिशा देण्यासाठी कंबर कसली आहे.केवळ नाटकाद्वारे जनजागृती करुन न थांबता आता प्रत्यक्ष 15 मुद्द्यांवर आधारीत व्यक्तिमत्त्व विकासाचे विनामूल्य मार्गदर्शन शाळा व काॅलेज मधून दिले जात आहे. कोकणात दहावी बारावीचा निकाल दरवर्षी 100 टक्के लागतो मात्र पुढील करिअर बद्दल स्पष्टता नसल्याने अनेक विद्यार्थी पदवी पूर्ण झाल्यावर मिळेल ते काम करण्यासाठी शहराकडे धाव घेतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी विद्यार्थ्यांनी करिअरचे नियोजन करणे आवश्यक आहे. मुलांमधील भिती व संकोच दूर करुन त्यांचा विश्वास वाढवणे, वक्तृत्व कौशल्य सुधारणे, चालण्या बोलण्यातील सभ्यता यावर या उपक्रमात भर दिला जात आहे. आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईलच्या आहारी जात आहेत. याचे शारिरीक व मानसिक दुष्परिणाम टाळण्यासाठी संस्थेचे संस्थापक सहदेव धर्णे स्वतः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आणि दैनंदिन दिनचर्या कसे असावे याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखवले जाते. या सामाजिक चळवळीला शाळा, महाविद्यालये, शिक्षक, पालक आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहकार्य करावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या शाळा व महाविद्यालयात या विनामूल्य व्यक्तिमत्त्व विकास व्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी सहदेव धर्णे - ९७०२०८७९३३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



