*अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या वाहनाचा लिलाव-दत्तात्रय जाधव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या वाहनाचा लिलाव-दत्तात्रय जाधव*
*अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या वाहनाचा लिलाव-दत्तात्रय जाधव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवापूर तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक करताना जप्त करण्यात आलेले वाहन क्रमांक GJ- 16-W-0086 चा लिलाव 15 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालय, नवापूर येथे होणार असल्याची माहिती तहसिलदार दत्तात्रय जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
वाहन मालकाला दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आले होते, परंतु त्यांनी अद्यापपर्यंत दंडाची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या तरतुदींनुसार सदर वाहनावर जमीन महसुलाची थकबाकी समजून हा लिलाव करण्यात येत आहे. सर्व इच्छुक नागरिकांनी या लिलावासाठी तहसील कार्यालय, नवापूर येथे उपस्थित राहावे, असेही आवाहन तहसीलदार जाधव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



