*विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यात होतेय कापूस उत्पादनात वाढ-कृषि विज्ञान केंद्रात कार्यशाळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यात होतेय कापूस उत्पादनात वाढ-कृषि विज्ञान केंद्रात कार्यशाळा संपन्न*
*विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यात होतेय कापूस उत्पादनात वाढ-कृषि विज्ञान केंद्रात कार्यशाळा संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, कोळदा, नंदुरबार येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपुर यांच्या मार्फत विशेष कापुस प्रकल्प नंदुरबार जिल्ह्यात राबविला जात आहे. प्रकल्पाअंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, कोळदा, नंदुरबार येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक कृषि महाविद्यालय नंदुरबारचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु. बी. होले, राजेंद्र दहातोंडे, वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख, पद्माकर कुंदे, विषय विशेषज्ञ, पिक संरक्षण, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार, लुपिन फौंडेशनचे पियू व्यवस्थापक सौ. शुभांगी पाटील व कु. जागृती पाटील, आयजीएस संस्थेची धनराज वळवी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. यु. बी. होले यांनी पुढील हंगामात रोग किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी फरदड घेणे टाळावे असे आवाहन केले. यावेळी त्यांनी कापसात येणाऱ्या प्रमुख किडींसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन व खर्च कमी पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. राजेंद्र दहातोंडे यांनी कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना कापूस उत्पादनासोबत कापूस विक्री व काढणी पश्चात तंत्रज्ञान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्माकर कुंदे यांनी केले, विषय विशेषज्ञ, पिक संरक्षण, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी जिल्ह्यात सुरु असलेला विशेष कापूस प्रकल्प-दादा लाड तंत्रज्ञानाचा उत्पादनावर झालेला परिणाम याबद्दल माहिती दिली. यावेळी दुर्गाप्रसाद पाटील यांनी कृषि विज्ञान केंद्रामार्फत कापूस पिकात सुरु असलेल्या विविध प्रात्यक्षिकांची माहिती तसेच यावर्षी सुरु कापूस प्रकल्पातील ठळक निष्कर्ष उपस्थिता समोर मांडले. संदिप कुवर यांनी यावर्षी प्रकल्पातील सर्व यशस्वी शेतकऱ्यांची यशोगाथा उपस्थित विस्तार कार्यकर्त्यांसमोर मांडले. लुपिन फौंडेशनचे व्यवस्थापक कु. जागृती पाटील यांनी लुपिन फौंडेशन संस्थेने जिह्यातील कापूस पिकात सुरु असलेले विविध प्रकल्पाची माहिती दिली. पद्माकर कुंदे, विषय विशेषज्ञ, पिक संरक्षण, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी प्रक्षेत्र भेटी वेळी कापूस कुट्टी यंत्र उपस्थितांना दाखविण्यात आले.
यावेळी पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जमिनीची प्रत सुधारण्यासाठी कापसाचे अवशेष जमिनीत गाढणे आवश्यक असून यासाठी कापूस कुट्टी यंत्र उपयुक्त असल्याचे सांगितले. कापसासाठी उपयुक्त अश्या अवजारांची पाहणी व मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप कुवर यांनी केले. लुपिन फौंडेशनचे विस्तार कार्यकर्ते व कृषिमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.



