*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन-मेजर निलेश पाटील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन-मेजर निलेश पाटील*
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन-मेजर निलेश पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसाठी भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी होण्याकरिता कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस (Combined Defence Service) या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक येथे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक अधिकारी मेजर निलेश पाटील (निवृत्त) यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
प्रशिक्षणाविषयी माहिती, कोर्स कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) कोर्स क्रमांक 65 .
कालावधी 19 जानेवारी 2026 ते 03 एप्रिल 2026 .
स्थळ छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक. सुविधा प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाईल, पात्रता
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवाराने लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. (CDS) परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज केलेला असावा. मुलाखतीची तारीख
इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीसाठी आवश्यक, सैनिक कल्याण विभाग, पुणे (Department of Sainik Welfare, Pune (DSW)) यांच्या वेबसाईटवरील CDS-66 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट काढून व ती पूर्ण भरून सोबत आणावी, पात्रता प्रमाणपत्र आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती सोबत घेऊन याव्यात, अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253- 2451032 व्हॉट्सॲप 9156073306 किंवा ई-मेल training.pctcnashik@gmail.com वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पाटील (निवृत्त) यांनी केले आहे.



