*कुणबी समाजोन्नती संघ, कुणबी युवा राजापूर तर्फे संघ संस्थापक माळी गुरुजी चषक 2026*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुणबी समाजोन्नती संघ, कुणबी युवा राजापूर तर्फे संघ संस्थापक माळी गुरुजी चषक 2026*
*कुणबी समाजोन्नती संघ, कुणबी युवा राजापूर तर्फे संघ संस्थापक माळी गुरुजी चषक 2026*
मुंबई(प्रतिनिधी):-कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि) शाखा तालुका राजापूर संलग्न कुणबी युवा राजापूर मुंबई यांच्या वतीने 1 फेब्रुवारी 2026 रोजी उमेळमाळ मैदान नायगाव पश्चिम येथे राजापूर तालुका गाव मर्यादित संघ संस्थापक माळी गुरुजी चषक 2026 चे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एक संघ होऊ या, सामाजिक बांधिलकी वाढवूया या अनुषंगाने राजापूर तालुका अंतर्गत कुणबी बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या माळी गुरुजी चषक स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला रु 25000 व माळी गुरुजी चषक, द्वितीय क्रमांकासाठी 15000 व माळी गुरुजी चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर यांनाही आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यंदा स्पर्धेचे 7 वे पर्व असून इच्छुक संघानी 20 जानेवारी पूर्वी प्रवेश फी जमा करुन आपला प्रवेश निश्चित करावा स्पर्धेतील प्रवेश व व अधिक माहितीसाठी महेश गोंडाळ - 8097074232, सचिन कुंभार - 8652244803, मनिष वालम - 9769399296 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन कुणबी युवा राजापूर मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.



