*जयनगर येथील श्री संत सावता माळी महिला भजनी मंडळातर्फे प्रबोधन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जयनगर येथील श्री संत सावता माळी महिला भजनी मंडळातर्फे प्रबोधन*
*जयनगर येथील श्री संत सावता माळी महिला भजनी मंडळातर्फे प्रबोधन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवसाला पावणाऱ्या हेरंब गणपती तीर्थक्षेत्र असलेल्या जयनगर येथील श्री संत सावता माळी महिला भजनी मंडळातर्फे भक्तिमय वातावरणात समाज प्रबोधन पर उपक्रमाची परंपरा कायम सुरू आहे.
सोनवद येथे नुकत्याच पार पडलेल्या भागवत कथा सप्ताहात जयनगर येथील श्री संत सावता माळी महिला भजनी मंडळाचा भजन संध्या कार्यक्रम ह.भ.प. भागवताचार्य ज्ञानेश्वर माळी महाराज यांच्या मार्गदर्शनात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम संकीर्तन आणि भजन सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.मंडळाच्या सदस्यांनी 'ज्ञानबा -तुकाराम'च्या जयघोषात विठ्ठल रुक्मिणीची आळवणी केली. यावेळी सादर केलेल्या अभंगवाणीने आणि सुश्राव्य भजनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा कीर्तनकार ह.भ.प. भागवताचार्य ज्ञानेश्वर माळी महाराज उपस्थित होते. त्यांनी "कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून महिलांनी जोपासलेली ही भजनाची परंपरा आपली संस्कृती टिकवण्यासाठी मोलाची आहे," असे गौरवोद्गार काढले.
हे भजनी मंडळ दर आठवड्याला एकत्र येऊन भजनाचा तसेच अभंग, गवळण यांचा सराव करते. केवळ भक्तीच नव्हे, तर सामाजिक कार्यातही या मंडळाचा मोठा सहभाग असतो. लेक वाचवा लेक शिकवा तसेच हुंडा प्रथा व लग्न कार्यात होणाऱ्या वायफळ खर्च यावर समाज प्रबोधन करण्याचे कार्य देखील या मंडळाद्वारे केले जाते.परिसरातील शेकडो महिला व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयनगर येथील श्री संत सावता माळी महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा सुशिलाबाई सतीष माळी, उपाध्यक्षा कमलबाई सतिष माळी, सचिव निर्मलाबाई धनराज माळी, तसेच सदस्य रेखाबाई भानुदास माळी, अनिता रमण माळी, रत्नाबाई शंकर माळी, वंदना सतिष गोसावी, इंदुबाई सोमलाल बागुल, सकुबाई मटू माळी, शोभाबाई कैलास माळी, निर्मलाबाई सुदाम माळी, आशाबाई संजु माळी, कमलबाई उखा माळी यांनी सहभाग घेतला.



