*बांग्लादेशी स्त्रियांना अवैधरित्या वास्तव्यास मदत करणाऱ्या व देहविक्री व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस 1 वर्ष 10 महिने कारावासाची शिक्षा, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधी
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बांग्लादेशी स्त्रियांना अवैधरित्या वास्तव्यास मदत करणाऱ्या व देहविक्री व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस 1 वर्ष 10 महिने कारावासाची शिक्षा, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधी
*बांग्लादेशी स्त्रियांना अवैधरित्या वास्तव्यास मदत करणाऱ्या व देहविक्री व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस 1 वर्ष 10 महिने कारावासाची शिक्षा, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे (भा.पो.से) यांची कारवाई*
नंदुरबार(प्रतिनिधी):-PITA (Prevention of Immortal Traffic Act) अंतर्गत दाखल गुन्हयातील आरोपी संजय ब्रिजलाल चौधरी, रा. नंदुरबार यास विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्याकडून घेण्यात आलेल्या चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्राच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने संबंधित आरोपीस 1 वर्ष 10 महिने अशी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर आरोपीविरुध्द PITA कायदयान्वये गुन्हा दाखल होऊन कारवाई करण्यात आली होती. बंधपत्रानंतर देखील आरोपीवर पुन्हा एकदा PITA कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता तसेच आरोपीने 2 बांग्लादेशी स्त्रियांना नंदुरबार येथे अवैधरित्या वास्तव्यास मदत केली होती व त्यांचेकडूनही देहविक्री व्यवसाय सुरू ठेवला होता, असे त्याच्यावर आरोप होते, सदर आरोपीचे बंधपत्र उल्लंघनाची बाब निदर्शनास येताच उपनगर पोलीस ठाणे मार्फत तात्काळ हे प्रकरण न्यायालयात सादर करण्यात आले, सुनावणीअंती न्यायालयाने सदर आरोपीस दोषी ठरवत त्यास 1 वर्ष 10 महिन्यांसाठी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. "सदर कारवाईमुळे अनैतिक व देश विघातक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना कडक इशारा देण्यात आला असुन, अशा प्रकारच्या गुन्हयांवर भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येईल," असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्याकडून देण्यात आला आहे.



