*बिलगांव ग्रामपंचायत सरपंचाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे चौकशीचे आदेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बिलगांव ग्रामपंचायत सरपंचाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे चौकशीचे आदेश*
*बिलगांव ग्रामपंचायत सरपंचाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे चौकशीचे आदेश*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव तालुक्यातील ग्रामपंचायत बिलगांव येथील लोकनियुक्त सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा ह्या निवडून आल्यापासून कायमस्वरूपी पुणे येथे कामानिमित्त गेल्यानंतर सरपंचाच्या नावावर, सरपंचाच्या गैरहजेरीत सरपंचाचे वडील जामसिंग काल्या पावरा हे ग्रामपंचायतचा अनागोंधी कारभार चालवित आहेत व ग्रामपंचायत बिलगांव येथे मुख्यालयी न राहणा-या, ग्रामपंचायतच्या कर्तव्यात कसूर करणा-या सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा यांना पदावरून हटवा, अपात्र करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजीच्या निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्या निवेदनाची दखल घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद नंदूरबार यांनी याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगांव यांना दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी चौकशीचे आदेश दिले आहेत. गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगांव यांनी दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत बिलगांव तालुका धडगाव यांना चौकशी करून मुद्देनिहाय चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2022 च्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून कुमारी आशा जामसिंग पावरा ह्या ग्रामपंचायत बिलगांव ता.धडगाव जि.नंदुरबार येथे निवडून आल्यापासून कामानिमित्त कायमस्वरूपी पुणे येथे राहतात. सरपंच आशा जामसिंग पावरा यांच्या गैरहजेरीत व सरपंच मुलीच्या नावावर वडील जामसिंग काल्या पावरा हेच अनेक कागदपत्रांवर खोट्या सह्या करून ग्रामपंचायत बिलगांवचा पूर्ण कारभार चालवत आहेत. सरपंच हे बिलगांव येथे राहत नसून पुणे येथे राहत असल्याकारणास्तव रहिवाशांना अनेक अडचणी येत आहेत. असा तक्रार अर्ज बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे देण्यात आला होता. चौकशी अहवालावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे बिलगांव सरपंचावर अपात्रतेची कारवाई करतील का? याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.



