*नवापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न*
*नवापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न* नवापूर(प्रतिनिधी):-48 वे नवापूर तालुका विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन ढोंगसागाळी येथील शासकीय आश्रमशाळेच्या आवारात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात सहा गटातून विद्यार्थ्यांनी 141 उपकरणांची मांडणी केली असून मंगळवारी या प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गटविकास अधिकारी देविदास देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्पाचे सहायक अधिकारी नंदकुमार साबळे होते. प्रारंभी सरस्वती माता प्रतिमा पूजन करण्यात आले. ढोंगसागाळी येथील शासकीय आश्रमशाळेच्या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी रमेश देसले, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश चौरे, जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलिंद वाघ, उपाध्यक्ष विनय गावित, सचिव अंबालाल पाटील, नवापूर मुख्याध्यापक संघाचे सल्लागार सुनील भामरे, अनुदानित आश्रमशाळा संघटनेचे अध्यक्ष दिनेश बिरारी, शिक्षण विस्तार अधिकारी डी. एच. माळी, विजय सोनार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य छगन महाले, ढोंगसागाळी गावाचे सरपंच संजय कामडे, सुरेश पाडवी, एस. सी. कोकणी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रदर्शन
गटविकास अधिकारी देविदास देवरे म्हणाले की, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी जीवन जलद व सुखकर झाले आहे. फोन पे, पेटीएम गुगल पे सारख्या सुविधा या सर्व विज्ञानाची देणं आहे. शहरी भागाच्या विद्यार्थ्यांसोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील आणण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी रमेश देसले यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व कल्पना मांडण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. कुठल्याही देशाचा जर विकास व्हायचा असेल तर त्या देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास किती प्रमाणात झाला याच्यावर विकास अवलंबून असतो. विज्ञान प्रदर्शनासाठी ढोंगसागाळीचे मुख्याध्यापक पाऊल गावित, एस. एच. पाटील यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. नवापूर तालुका पंचायत
समिती शिक्षण विभाग, नवापूर तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ढोंगसागाळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 48 वे नवापूर तालुका विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम मंगळवारी झाला. या प्रदर्शनातून विजेते उपकरणे जिल्हास्तरीय प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
ढोंगसागाळी येथील शासकीय आश्रमशाळेत नवापूर तालुका विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. समारोपप्रसंगी आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे, उपशिक्षण अधिकारी डॉ. युनूस पठाण, गटशिक्षणाधिकारी रमेश देसले, नवापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलिंद वाघ, उपाध्यक्ष विनय गावित, संजयकुमार जाधव, सल्लागार सुनील भामरे, सचिव अंबालाल पाटील, मुख्याध्यापक पाऊल गावित, कोषाध्यक्ष दिनेश बिरारीस, केंद्रप्रमुख निंबा पाकळे उपस्थित होते. मार्गदर्शन करताना सांगितले की, भरत माणिकराव गावीत
अध्यक्ष, आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे, नवापूर, 48 वे नवापूर तालुका विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन
या भव्य व प्रेरणादायी उपक्रमाच्या मंचावर उपस्थित राहून मनोगत व्यक्त करताना मला अत्यंत आनंद व अभिमान वाटत आहे. आजचे विज्ञान प्रदर्शन हे केवळ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण नसून, त्यांच्या कल्पकतेचा, संशोधनशील वृत्तीचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उत्सव आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेली मॉडेल्स, प्रयोग व शैक्षणिक साहित्य हे त्यांच्या नवोन्मेषी विचारांचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे उत्तम प्रतीक आहे.
विज्ञान शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारसरणी, समस्या सोडवण्याची क्षमता व आत्मविश्वास विकसित होतो. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही स्वतःच्या प्रतिभेची जाणीव होते आणि ते देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रेरित होतात. या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण विभाग, पंचायत समिती नवापूर, नवापूर तालुका मुख्याध्यापक संघ, सर्व शिक्षकवृंद, मार्गदर्शक, परीक्षक तसेच मेहनती विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. पालकांचे सहकार्य आणि समाजाचा सकारात्मक सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.
भविष्यात अशा विज्ञान व शैक्षणिक उपक्रमांतून नवापूर तालुक्यातील विद्यार्थी संशोधक, अभियंते, डॉक्टर व शास्त्रज्ञ म्हणून घडावेत, हीच अपेक्षा व्यक्त करून माझे मनोगत संपवितो. 60 शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवत 141 उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थी व उपकरणे
उच्च प्राथमिक गटातून प्रथम चिंतन हितेश पटेल ऑफस्टॅकल अवॉर्डर जवाहर नवोदय विद्यालय श्रावणी, द्वितीय छत्रसाल राहुल साळुंखे मॅजिक टेबल श्री शिवाजी हायस्कूल, नवापूर, तृतीय चाहेल दर्शनकुमार प्रजापत इलेक्ट्रिक हायवे लिटल एंजल अकॅडमी नवापूर, माध्यमिक गटात प्रथम राहुलकुमार यादव हाकार मेकॅनिझम धर्मीबाई जी. अग्रवाल शाळा चिंचपाडा, द्वितीय तन्मय चंद्रकांत पाटील. कार एलेवेटर एस. एम. चोखावाला एंजल स्कूल, नवापूर, तृतीय पुष्पक राजधर जाधव- बहुपयोगी बूट श्री शिवाजी हायस्कूल नवापूर, आदिवासी राखीव माध्यमिक गट प्रथम पार्थ बजरंग गावित डुलकी येणाऱ्या चालकामुळे होणारे अपघात टाळणे श्री शिवाजी हायस्कूल, नवापूर, शिक्षक निर्मित अध्यापन साहित्य प्राथमिक गट प्रथम गोपाल होनजी गावित आनंददायी शिक्षण जिल्हा परिषद शाळा मेंदीपाडा, शिक्षक निर्मित अध्यापन साहित्य माध्यमिक गट प्रथम रामदास जेम्या गावित गणितीय पेटी शासकीय आश्रमशाळा, सागाळी, प्रयोगशाळा सहायक व परिचर साहित्य गटातून प्रथम संजय फत्तू मावची बहुउद्देशीय साधा सूक्ष्मदर्शक सार्वजनिक मराठी हायस्कूल, नवापूर, व माध्यमिक दिव्यांग गटात प्रथम वृषाली गणेश वळवी संजीवनी स्कूल बॅग- वनवासी विद्यालय, चिंचपाडा, उपकरणांचे परीक्षण स्वाती बारी, नयना पवार, भरत चव्हाण, रिजवानखान पठाण, दिलीप बोरसे, अमरजित आरंभी, फरहान शेख, कमलेश सोजळ यांनी केले. समारोप कार्यक्रमाला तालुक्यातून विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक उपस्थित होते.



