ताजा खबरे:
*रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम*
*जयनगर येथील श्री संत सावता माळी महिला भजनी मंडळातर्फे प्रबोधन*
*राजापूर तालुक्यातील तळवडे येथे आज भव्य मोफत आरोग्य शिबीर,ॲड अपूर्वा सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन*
*कुणबी समाजोन्नती संघ, कुणबी युवा राजापूर तर्फे संघ संस्थापक माळी गुरुजी चषक 2026*
*राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’चे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*डी.आर.हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*डी.आर.हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न*

  • Share:

*डी.आर.हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील श्रीमती डी.आर. हायस्कूल येथे शैक्षणिक वर्ष 2025- 26 चे वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य आ. बा. टेंभेकर, संस्थेचे चेअरमन नरेंद्र सराफ तर प्रमुख अतिथी म्हणून शहरातील उद्योगपती अनिल वाणी, शाळेचे माजी विद्यार्थी व नाशिक येथील प्रसिद्ध नेत्र शल्य चिकित्सक डॉ अर्पित शाह, माजी विद्यार्थी उपअभियंता वर्ग 1, प्रधान मंत्री ग्रामसडक योजना जी.प. नंदुरबार ललित पाटील, सचिव प्रशांत पाठक, कार्यकारिणी सदस्य पंकज पाठक, मुख्याध्यापक मोहन अहिरराव, उपमुख्याध्यापक  श्रीराम मोडक, पर्यवेक्षक संजय सैंदाणे, हेमंत खैरनार तसेच नंदुरबार एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व शाळांचे  मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलननाने झाली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेखनकला, कल्पकता यांना वाव मिळावा म्हणून शाळेत दरवर्षी सुगंध हस्तलिखित मराठी विभागाकडून तयार करण्यात येत असते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, आवड निर्माण व्हावी यासाठी विज्ञान विभागामार्फत नई उडान हे भित्तिपत्रक संपूर्ण वर्षभर कार्यरत असते. तसेच भूगोल विभागामार्फत सुद्धा विद्यार्थ्यांना भूगोल विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी विविध खगोलीय माहितीचे संग्रह करून भुगोलांगण हस्तलिखित तयार करण्यात येत असते. या तीनही हस्तलिखितांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शाळेतील काही शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला. यामध्ये शाळेतील NCC कमांडर राहुल पाटील यांना NCC वेलफेअर बोर्ड महाराष्ट्र राज्य तर्फे, राज्यस्तरीय best ANO पुरस्कार जाहीर झाला. तसेच शाळेतील क्रीडा शिक्षक जगदीश बच्छाव यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्यामार्फत विभागीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शाळेतील गणित शिक्षक योगेशकुमार गवते यांना SCERT पुणे, महाराष्ट्र शासन अधिकारी, कर्मचारी व शिक्षक गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर निवड झाली. शाळेतील विज्ञान शिक्षक राजेन्द्र पाटील यांना SCERT पुणे, महाराष्ट्र शासन अधिकारी, कर्मचारी व शिक्षक विज्ञान ऑलिम्पियाड  स्पर्धेत नाशिक विभागात पाचवा क्रमांक मिळवून राज्यस्तरावर निवड झाली. या सर्व शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दरवर्षी शाळेत ॲड. म.म. मोडक यांच्या स्मरणार्थ व संस्थेचे माजी चेअरमन ॲड. परीक्षित मोडक यांच्यातर्फे गुणी शिक्षक पुरस्कार हा जाहीर केला जात असतो. या वर्षाचा गुणी शिक्षक पुरस्कार शाळेतील शिक्षक प्रशांत पाटील यांना जाहीर करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शाळेतील अष्टपैलू व गुणवंत विद्यार्थी म्हणून जन्मेजय पगारे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली त्यास कै. चंद्रकांत हरी मराठे यांच्या स्मरणार्थ डॉ. संजय मराठे मुंबई यांच्यातर्फे रोख पाचशे रुपये व फिरता स्मृती चषक प्रदान करण्यात आला. तसेच इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांमध्ये तीन गटांमध्ये शाळेचे विज्ञान शिक्षक योगेश गवते व दिनेश वाडेकर यांचे तर्फे आदर्श विद्यार्थी पुरस्कार 5 वी ते 6 वी च्या गटात सोहम गवळी, 7 वी ते 8 वी च्या तेजस वाडेकर, 9 वी ते 10 वी च्या गटात यश राठोड यांना प्रदान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे अनिल वाणी यांनी यांनी विद्यार्थ्यांना यश हे सहजासहजी मिळत नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, मोबाईलचा वापर कमी करावा हे सांगितले. तसेच दुसरे प्रमुख पाहुणे डॉ अर्पित शाह  यांनी विविध स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे हा गरजेचे आहे, यश अपयश हा स्पर्धेचा एक भाग आहे मुलांनी निराश न होता पुन्हा जोमाने तयारी करावी असे मार्गदर्शन केले.
तसेच प्रमुख पाहुणे ललित पाटील यांनी मुलांना परिस्थिती कितीही हलाखीची असली तरीही यशाला गवसणी घालता येते हे सांगितले. अध्यक्षीय समारोपात आ. बा. टेंभेकर यांनी विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात पुढे जा, शालेय जीवनात मेहनतीशिवाय पर्याय नाही हे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता साळी, पाहुण्यांचा परिचय व सत्कार राजेंद्र लांडगे,बक्षीस यादी वाचन विशाल मच्छले, क्रीडा पारितोषिक यादी वाचन जगदीश बच्छाव यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव श्री प्रशांत पाठक यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम*
January, 08 2026
*जयनगर येथील श्री संत सावता माळी महिला भजनी मंडळातर्फे प्रबोधन*
January, 08 2026
*राजापूर तालुक्यातील तळवडे येथे आज भव्य मोफत आरोग्य शिबीर,ॲड अपूर्वा सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन*
January, 08 2026
*कुणबी समाजोन्नती संघ, कुणबी युवा राजापूर तर्फे संघ संस्थापक माळी गुरुजी चषक 2026*
January, 08 2026
*राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’चे आयोजन*
January, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज