*बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे "भीम योद्धा" पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे "भीम योद्धा" पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
*बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे "भीम योद्धा" पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
नांदेड(प्रतिनिधी):-बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्ट सहयोग नगर नांदेडच्या वतीने 2026 चा "भीम योद्धा" पुरस्कार साठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे भीम योद्धा हे पुरस्कार दिले जातात. यावेधी हा वितरण सोहळा 31 जानेवारी 2026 रोजी करण्यात येणार असून या कार्यक्रमामध्ये भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे सैनिक, महार बटालियन मधील सेवानिवृत्त सैनिक आणि पोलीस दलातील सेवानिवृत्त कर्मचारी ज्यांनी राष्ट्रीयकार्य,धम्मकार्य आणि समाजकार्यामध्ये भरीव योगदान दिलेली आहे अशा कर्तबगार मान्यवरचा भीम योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. कर्तबगार मान्यवरांचे पुरस्कारासाठीचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्यासाठी निवड समिती नियुक्ती करण्यात आली आहे.
समता सैनिक दलातील जवानांन व पदाधिकाऱ्यां साठी केंद्रीय शिक्षक आद. युवराज मोरे (9422745211), महार बटालियन मधील सेवानिवृत्त सैनिक साठी आद. देवराव झगडे (8600952588), सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी साठी आद. अशोक जोंधळे(9823975999)यांची निवड समिती असून पात्र मान्यवरांनी आपले प्रस्ताव दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत निवड समिती कडे "माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोग नगर नांदेड 431605 या पत्त्यावर पाठवावेत असे आवाहन बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी रमेश कोकरे (अध्यक्ष), राजेश बिऱ्हाडे (सचिव) सुभाष मल्हारे,(कोषाध्यक्ष), प्रवीण कुपटीकर(सहसचिव)रमेशराव सूर्यवंशी (सदस्य), भिमराव सोनाळे(सदस्य) यांनी केले आहे.



