*भटक्या विमुक्त जाती जमातीना विविध प्रकारच्या दाखल्यासाठी कुवांरबाव ग्रामपंचायतीत आयोजित कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भटक्या विमुक्त जाती जमातीना विविध प्रकारच्या दाखल्यासाठी कुवांरबाव ग्रामपंचायतीत आयोजित कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*भटक्या विमुक्त जाती जमातीना विविध प्रकारच्या दाखल्यासाठी कुवांरबाव ग्रामपंचायतीत आयोजित कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-शहरातील कुवारबाव ग्रामपंचायत येथे दि.30 डिसेंबर 2025 रोजी भटक्या विमुक्त जाती जमातींना जातीचे दाखले व इतर सर्व प्रमाणपत्रसाठी अर्ज दाखल करण्याकरता कॅम्प आयोजित करण्यात आला होता सदर कॅम्पचे उद्घाटन प्रांताधिकारी जिवन देसाई, मंडलाधिकारी विजय राठोड, पुरवठाधिकारी श्रिमती पाईकराव, कुवारबांव प्रशासन अधिकारी श्रिमती तळेकर, पोमेंडी खुर्द व खेडशीचे तलाटी गुशिंगे, कुवारबांवचे तलाठी पाटील, पानवलचे तलाठी नेवरेकर, भटक्या विमुक्त वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरीचे मॅनेजर खेडकर, माजी सरपंच विनोद झाडगांवकर, कटबु समाजाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व भटक्या विमुक्त जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य बी टी मोरे, सरोदे समाजचे सल्लागार संतोष भागवत, सरोदे समाजचे सचिव राजेश आयरे, वडार समाज व भटक्या विमुक्त जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य अशोक हळकुटगी, ट्रुकॉपी करण्याकरिता सौ. विधीशा सिद्धेश खत्री, यांच्या सोबत सौ.भाग्यश्री मिथून खेत्री आणि कु. पिंकी सायबण्णा खेत्री हे उपस्थित होते. व कटबु समाजाचे उपाध्यक्ष श्री अशोक खेत्री, जिल्हा अध्यक्ष संतोष खेत्री, सचिव संजू गंगाधर खेत्री, सहसचिव धोंडीबा खेत्री उपस्थित होते. आणि इतर सर्व कटबु समाज बांधव खूप मोठ्या प्रमाणात या कॕपचे लाभ घेण्याकरिता सहभाग घेतला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटन रत्नागिरीचे प्रांताधिकारी मा. जीवन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. आणि समस्त लाभार्थीना मार्गदर्शन केले. कटबु समाजाचे अध्यक्ष बी टी मोरे यांनी सदर कॕप आयोजित करण्यासाठी सुरवाती पासून आपले सहकारी संतोष भागवत, राजेशजी आयरे, सदानंदजी महाकाळ यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. तसेच राजेश आयरे, संतोष भागवत, सदानंद महाकाळ यानी प्रशासनाचे आणि उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रम सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालवण्यात आला. त्यामध्ये जातिचे दाखल्याचे अर्ज भरून घेण्याकरिता पराग लोटणकर आणि राजू रेवाळे आणि पुरवठा विभागाचे कर्मचारी व अधिकारी, आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठीचे कर्मचारी व अधिकारी हे सर्व उपस्थित होते. सदर कॕमध्ये जातीचे दाखले 90 नग, आधार कार्ड अपडेट आणि ऑनलाईन 13 नग, आभा कार्ड 25 नग, रेशनकार्ड ऑनलाईन 23 नग, जेष्ठ नागरिक कार्ड 2 नग, आयुष्यमान कार्ड 29 नग. असे सर्व विमुक्त जाती व भटक्या जमातीचे समाज बांधवांनी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले प्रमाणपत्राचे लाभ घेतले हा कार्यक्रम खूप उत्कृष्टरित्या पार पडला.



