*जी. टी. पाटील महाविद्यालय द्वारे, शेतकरी सहायता उपक्रम अंतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती देणारी कार्यशाळा सोनगीरपाडा येथे संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी. टी. पाटील महाविद्यालय द्वारे, शेतकरी सहायता उपक्रम अंतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती देणारी कार्यशाळा सोनगीरपाडा येथे संपन्न*
*जी. टी. पाटील महाविद्यालय द्वारे, शेतकरी सहायता उपक्रम अंतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती देणारी कार्यशाळा सोनगीरपाडा येथे संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी टी पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अजिवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोनगीरपाडा येथे शेतकरी सहायता उपक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासंदर्भात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नंदुरबार तालुका विधायक समितीचे संचालक बी.के. पाटील उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला शेतकऱ्यांना उपकृत केले. तसेच सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य क ब चौ उमवी जळगाव डॉ. एम. जे.रघुवंशी हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या उद्घाटनपर मनोगतात शेतकरी हा राष्ट्राचा कणा आहे. शेतकरी अनेक संकटातून जात असतो त्या संकटांवर मात करण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा उद्देश सदर कार्यशाळेचा आहे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे समन्वयक आदरणीय डॉ.एम एस रघुवंशी, डॉ. एन डी चौधरी प्राचार्य विधी महाविद्यालय नंदुरबार यांनी शेतकऱ्यांना विविध योजना शासकीय अधिकाऱ्यांमार्फत कशा पद्धतीने पोहोचतील याबद्दल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. जयवंत उत्तरवार कृषी विज्ञान केंद्र कोळदा यांनी शेतीत नवनवीन प्रयोग कशा पद्धतीने करावे हे शेतकऱ्यांना समजून सांगितले. सदर कार्यक्रमाचे दुसरे वक्ते कृषी अधिकारी वसंत वळवी यांनी शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची सविस्तर अशी माहिती दिली. तिसरे प्रमुख वक्ते उत्सव पाटील कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासंदर्भातील विविध कार्यशाळा आयोजित करून शासकीय योजना प्राप्त करण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर करावा हे सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. एम आर पाटील व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एन पी हुसे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनगीरपाडा गावचे सरपंच उरीदास गांगुर्डे, प्रा.डी.डी. गावित, प्रा. महेंद्र गावित, प्रा. डॉ. योगेश मराठे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाला 153 शेतकरी उपस्थित होते.



