*राजापूरातील श्री ठाणेश्वर इलेव्हन क्रिकेट संघ वाडापाणेरेने पटकावला 'दोस्ती यारी चषक'*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूरातील श्री ठाणेश्वर इलेव्हन क्रिकेट संघ वाडापाणेरेने पटकावला 'दोस्ती यारी चषक'*
*राजापूरातील श्री ठाणेश्वर इलेव्हन क्रिकेट संघ वाडापाणेरेने पटकावला 'दोस्ती यारी चषक'*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील आडीवरे परिसरातील शिवांश इलेव्हन आयोजित 'दोस्ती यारी चषक' स्पर्धा रविवार 4 जानेवारी 2026 आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धत वाडी मर्यादित 16 संघ सहभागी झाले होते, आडीवरे, नाटे, धाऊलवल्ली राजापूर पावस विभागातील 16 संघ सहभागी झाले होते हि क्रिकेट स्पर्धा अटीतटीची रंगतदार अवस्थेत आणि शांततेत पार पडली, 16 मातब्बर संघात रंगलेल्या या स्पर्धेत श्री ठाणेश्वर इलेव्हन वाडापाणेरे संघाने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत सर्वाची मने जिंकली विजयी संघांचे आणि संघातील खेळाडूंचे ग्रामविकास मंडळ वाडापाणेरेतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या स्पर्धेत अंतिम विजेता संघ श्री ठाणेश्वर इलेव्हन वाडापाणेरे, उपविजेता संघ अक्की इलेव्हन, पावस उत्कृष्ट फलंदाज अंकित बंडबे (वाडापाणेरे), उत्कृष्ट गोलंदाज यश बंडबे (वाडापाणेरे), मालिका वीर प्रितम (अक्की इलेव्हन पावस) आदी टीम व खेळाडूंना आयोजकांतर्फे गौरविण्यात आले.



