ताजा खबरे:
*नवापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न*
*डी.आर.हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न*
*बामखेडा महाविद्यालयाच्या शिबिरात सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
*बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे "भीम योद्धा" पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
*भटक्या विमुक्त जाती जमातीना विविध प्रकारच्या दाखल्यासाठी कुवांरबाव ग्रामपंचायतीत आयोजित कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*महिला महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा उंटावद येथे उद्घाटन सोहळा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*महिला महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा उंटावद येथे उद्घाटन सोहळा संपन्न*

  • Share:

*महिला महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा उंटावद येथे उद्घाटन सोहळा संपन्न*        
शहादा(प्रतिनिधी):-सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचा उद्घाटन संपन्न झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाच्या वतीने दत्तक गाव असलेले श्रीक्षेत्र उंटावद येथे 5 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान होणाऱ्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराची मुख्य संकल्पना' शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमीन विकासावर विशेष भर ' ही असून यात   पाणलोट व्यवस्थापन या विषयावर प्रा. डॉ. डी. वाय. पाटील, महिला आरोग्य व आहार याविषयावर डॉ. दीपक मोरे, मैदानी खेळ व बुद्धिमत्ता विकास या विषयावर प्रा. डॉ. अरविंद कांबळे, मोबाईल व आजचा विद्यार्थी या विषयावर प्रा. संगीता पटेल, निर्मल जीवनाची चावी ध्यानयोग, ज्योती काकुस्ते, महिला संरक्षण काळाची गरज या विषयावर प्रा. योगिता बैसाणे, आधुनिक तंत्रज्ञानातील बदल व सुधारणा या विषयावर प्रा. डॉ. साहेबराव ईशी, अध्यात्म उन्नती व मन:शांती विकास प्रा. एन. डी. निझरे यांचे प्रात्यक्षिकासह विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय पडीक जमिनीवर 'एक पेड माँ के नाम' याअंतर्गत वड, पिंपळ, उंबर व लिंब आदी रोपांचे वृक्षारोपण रोकडमल हनुमान मंदिर मागील पडीक जमिनीवर करण्यात येणार आहे.                                                                         रोकडमल हनुमान मंदिर प्रांगणात महिला महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी शिबिराचा उद्घाटन समारंभाच्या  अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. संजय जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव, रोकडमाल हनुमान मंदिर ट्रस्टचे सचिव व ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, खजिनदार भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लिमजी पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्यडॉ. व्ही. एस. पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीमती एस. यु. अहिरराव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनिल साळुंके, प्रा. डॉ. ए. एम. पाटील, प्रा. बी. आर. राजपूत, प्रा. डॉ. भारत चाळसे, प्रा. डॉ. प्रसन्ना डांगे, प्रा. श्रीमती एच. आर. कुलकर्णी व विद्यार्थिनी स्वयंसेविका उपस्थित होते.                                      याप्रसंगी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची प्रतिमा, श्रम साहित्याचे पूजन व श्रीफळ वाढवून उद्घाटन तसेच या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे शासनाच्या 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमाअंतर्गत रोकडमल हनुमान ट्रस्ट मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मातोश्री कै. दत्तीबाई तुमडू पाटील यांच्या स्मरणार्थ मंदिरामागील पडीक जमिनीवर वृक्षारोपण उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. संजय जाधव यांनी, 'राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांवर शाश्वत संस्कार टाकले जाते, या खऱ्या शाश्वत संस्कारांचे पहिले पाऊल म्हणजे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर होय, अशा शिबिरांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व सामाजिक बांधिलकी जागृत होते,' असे प्रतिपादन केले.                                                                याप्रसंगी वर्षा जाधव यांनी, राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष हिवाळी शिबिर हे सुसंस्काराची शिदोरी असून ग्रामविकासातून पर्यायाने राष्ट्र विकासात आपले योगदान असावे तसेच समाजाप्रती आपले देणे लागतो ही देण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, यासाठी अशा शिबिरांचे आयोजन केले जाते, अशी भावना व्यक्त केली. महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हि. एस. पाटील यांनी, सामाजिक परिवर्तनासाठी विद्यार्थ्यांनी समाजात आपले योगदान देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:मधील संवेदनशीलता जपत सुप्त गुणांना आविष्कृत करावे व हे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात होत असल्याचे सांगितले. यावेळी रोकडमल हनुमान मंदिर ट्रस्टचे सचिव प्रकाश पाटील यांनी, या शिबिराला मंदिर ट्रस्ट व गावाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासित केले.  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. यू. अहिरराव, सूत्रसंचलन व आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनिल साळुंके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नवापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न*
January, 07 2026
*डी.आर.हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न*
January, 07 2026
*बामखेडा महाविद्यालयाच्या शिबिरात सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
January, 07 2026
*बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे "भीम योद्धा" पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
January, 07 2026
*भटक्या विमुक्त जाती जमातीना विविध प्रकारच्या दाखल्यासाठी कुवांरबाव ग्रामपंचायतीत आयोजित कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद*
January, 07 2026

थोडक्यात बातमी

*नवापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न*
January, 07 2026
*डी.आर.हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न*
January, 07 2026
*बामखेडा महाविद्यालयाच्या शिबिरात सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
January, 07 2026
*बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे "भीम योद्धा" पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
January, 07 2026
*भटक्या विमुक्त जाती जमातीना विविध प्रकारच्या दाखल्यासाठी कुवांरबाव ग्रामपंचायतीत आयोजित कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद*
January, 07 2026

थोडक्यात बातमी

*नवापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न*
January, 07 2026
*डी.आर.हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न*
January, 07 2026

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज