*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे 3 जानेवारी 2026 रोजी थोर समाजसुधारिका, कवयित्री व स्त्रीशिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंकज चौधरी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी केलेले अपार कष्ट, समाजातील अन्याय व अंधश्रद्धांविरोधातील लढा तसेच महिलांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणारे त्यांचे कार्य यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. राहुल लोहारे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची चळवळ उभी केली. आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्राध्यापकांनीही सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विचार मांडले, प्रेरणादायी संदेश वाचले तसेच स्त्रीशिक्षण व सामाजिक समानतेवर मनोगत सादर केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, समानतेची भावना व प्रेरणा निर्माण झाल्याचे दिसून आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून शिक्षण, समानता व सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. अशा प्रेरणादायी उपक्रमांमुळे शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले सदरील कार्यक्रम साजरा करण्याबाबत संस्थेचे अध्यक्ष श्रीमती योगिता गणेश पाटील व सचिव गणेश गोविंद पाटील आणि प्राचार्य डॉ.पंकज एम चौधरी यांनी कौतुक केले.



