*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीची अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर समन्वय समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीची अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर समन्वय समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा*
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीची
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर समन्वय समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा*
मुंबई(प्रतिनिधी):-राज्यसह देशातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात दिल्ली येथील आंदोलन यावर विचारविनिमय करण्यासाठी 4 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता हरिकृपा बिल्डिंग,शिवाजी रोड,पनवेल, नवी मुंबई येथे समन्वय समितीच्या निमंत्रकांची महत्वपूर्ण बैठक पार पडली, सदर बैठकीत केंद्र सरकारच्या अर्थ संकल्पीय (बजेट) अधिवेशन काळात सेविका मदतनीसांच्या मानधनासाठी भरीव तरतूद करून वाढ करावी, प्रोत्साहन भत्त्याचे निकष बदलवून तो दरमहा सरसकट लागू करावा, पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, सुप्रीमकोर्टाच्या आदेशानुसार सेविका मदतनिसांना ग्रॅच्युटी लागू करावी, सेवानिवृत्ती नंतर दरमहा पेन्शन लागू करावी, गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेविकांना 24800 रुपये आणि मदतनीसांना 20400 रुपये वेतन लागू करावे. यांसह अन्य मागण्यांसाठी दिल्ली येथे अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधिंनीचे देशव्यापी धरणे आंदोलन करण्यावर चर्चा करण्यात आली तत्पूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह आपआपल्या लोकसभा मतदार संघातील खासदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करावे, तसेच नागपूर येथे झालेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने आझाद मैदान मुंबई येथेही राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे नियोजन करावे, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीत युवराज बैसाणे, कु.श्रुती म्हात्रे (दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या सुकन्या), संजय मापले, रामकृष्ण बी. पाटील, अमोल बैसाणे,एकनाथ ठोंबरे आदी उपस्थित होते.



