*धडगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील बालीकेवर लैंगिक अत्याचार करणारा मुख्याध्यापक स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*धडगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील बालीकेवर लैंगिक अत्याचार करणारा मुख्याध्यापक स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात*
*धडगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील बालीकेवर लैंगिक अत्याचार करणारा मुख्याध्यापक स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील धडगाव येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता 8 वीचे शिक्षण घेत असलेल्या 14 वर्षीय बालीकेला *** जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिचेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापक नामे सायसिंग मोवाश्या वसावे, वय 50 वर्षे, रा. भांग्रापाणीचा उमटीपाडा, ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार व सदर मुख्याध्यापक यास गुन्हयात सहकार्य करणाऱ्या हॉस्टेलच्या मॅडम मालती फत्तू पाडवी, वय 40 वर्षे, रा. मोजरा ता.धडगाव जि. नंदुरबार यांचे विरुध्द धडगाव पोलीस ठाणे येथे दि.23 डिसेंबर 2025 रोजी गु.र.नं. 217/2025 भा.न्या. संहिता कलम 64 (2) (f), 64(2)(m), 65(1), 351(3) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासुन संरक्षण अधि. 2012 चे कलम 6 व 17 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपी हे काही दिवसांपासुन फरार होते. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी मुख्याध्यापक सायसिंग मोवाश्या वसावे हा शहादा येथील नवागाव परिसरात आहे, बाबत खात्रिशीर माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लागलीच पथकास माहिती कळवुन आरोपीला ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या. स्था.गु.शा. पथकाने शहादा तालुक्यातील नवागाव येथे जाऊन आरोपी सायसिंग वसावे याचा शोध घेतला असता तो मिळुन आला. सदर आरोपीला धडगाव पोलीसांचे ताब्यात देण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोहेको/मोहन ढमढेरे, जितेंद्र पाडवी, मनोज नाईक, पोना/विकास कापुरे अशांनी केली आहे.



