*बामखेडा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संपन्न*
*बामखेडा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संपन्न*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय बामखेडा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर जयनगर ता. शहादा जि. नंदुरबार येथे माजी सैनिक गोरख रघुनाथ बोरसे यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील उपस्थित घेण्यात आला तसेच प्रमुख अतिथी म्हणून जयनगरचे सरपंच श्री मोगराज सतीष सोनवणे, गटनेते तथा उपसरपंच वनश्री ईश्वर संतोष माळी, श्री चक्रधर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य ईश्वर देवमन माळी, श्री हिरालाल माळी, सौ.सिंधूबाई सहारे, सौ.मंगलबाई माळी, डी.सी.पटेल व सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. वाय सी गावित यांनी केले त्यात त्यांनी शिबिर कालावधीत कोणकोणते कार्यक्रम घेतले जाणार आहेत यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी उद्घाटक माजी सैनिक गोरख रघुनाथ बोरसे यांनी आपल्या अनुभवाचे बोल कथन केले व केलेल्या कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला तसेच सैन्य भरती होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात या गोष्टीवर त्यांनी मार्गदर्शन केले श्री चक्रधर माध्यमिक आणि कै मुक्ताबाई आंबेकर उच्च माध्यमिक विद्यालय जयनगर विद्या मंदिराचे प्राचार्य ईश्वर देवमन माळी यांनीही विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व पटवून दिले श्रम करताना मनात विचार न करता आपण देशाची सेवा कशी करावी याबद्दल त्यांनी अनेक उदाहरणे दिली व विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व पटवून दिले महाविद्यालयाचे प्राचार्यांनी शाश्वत विकास आणि भौतिक विकास याच्यावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सी. एस. करंके यांनी केले याप्रसंगी महाविद्यालयातील प्रो. डॉ. वाय. आर. पाटील डॉ. बी. एन. गिरासे स्वप्निल गुजर डॉ .सुंदर पाडवी प्रा. एम. एस. निकुंबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रगटन महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. के. पी. पाटील यांनी केले.



