*नायलॉन मांजाची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने माल मागविणाऱ्याविरुध्द शहर पोलीसांची कारवाई, नायलॉन मांजाचा वापर, विक्री, वाहतुक व साठवणूक करणा-यांवर पोलीसांचे विशेष लक्ष*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नायलॉन मांजाची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने माल मागविणाऱ्याविरुध्द शहर पोलीसांची कारवाई, नायलॉन मांजाचा वापर, विक्री, वाहतुक व साठवणूक करणा-यांवर पोलीसांचे विशेष लक्ष*
*नायलॉन मांजाची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने माल मागविणाऱ्याविरुध्द शहर पोलीसांची कारवाई, नायलॉन मांजाचा वापर, विक्री, वाहतुक व साठवणूक करणा-यांवर पोलीसांचे विशेष लक्ष*
नंदूरबार(प्रतिनिधी):-3 जानेवारी 2026 रोजी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी हेमंतकुमार पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक चारचाकी टेम्पो हा प्रतिबंधीत असलेल्या नायलॉन मांजाचे पुड्यांचे कार्टून ठेवून बाहेरपुरा भागात उभा आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. सदर बातमीचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी हेमंतकुमार पाटील यांनी लागलीच पोलीस ठाणे डी.बी. पथकास मिळालेल्या बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी रवाना केले. मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे नंदुरबार शहर डी. बी. पथक हे शहरातील बाहेरपुरा भागात सदर टेम्पोचा शोध घेत असता गौतम ट्रेडर्स नावाचे दुकानाचे परिसरात एक टाटा एस कंपनीचा मालवाहू टेम्पो क्रमांक MH 47 E 1252 असा मिळुन आला. त्यात मिळालेल्या गोपनिय माहितीप्रमाणे मांजाचे पुड्यांचे कार्टून दिसले. सदर टेम्पो चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अर्जुन अहिरे, वय 47 वर्षे, रा. बाहेरपुरा, संत रोहिदास चौक, नंदुरबार असे सांगितले. त्यास सदर टेम्पोमध्ये काय आहे बाबत विचारणा करता त्याने सांगितले की, सदरचे कार्टून शहादा येथील काशिनाथ मार्केटमध्ये सोना गॅस एजेन्सी समोर एक इसम मोटारसायकलवर घेऊन आला व त्याने मला वाहतुकीचे 'भाडे देऊन एक मोबाईल क्रमांक देत सदर पार्सल नंदुरबार येथे पोहचुन देणेबाबत सांगितले. त्याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल करुन माहिती घेता सदरचा माल नंदुरबार येथील कल्पेश भोई यांचा असल्याचे समजले. त्यानंतर सदर वाहनातील मुद्देमाल तपासला असता त्यामध्ये प्रतिबंधीत असलेल्या नायलॉन मांजाचे एकुण 60 प्लॅस्टीकचे रिल व वाहन असा मिळुन एकुण 6 लक्ष 70 हजार रुपये रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरचा शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजाची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने माल मागविणाऱ्या कल्पेश भोई याचा शहर डी. बी. पथकाने शोध घेतला असता तो मिळुन आला. त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव कल्पेश उमेश जावरे, वय 25 वर्षे, रा.जुनी भोई गल्ली, नंदुरबार असे सांगितले. त्यास डी. बी. पथकाने ताब्यात घेत त्याचेविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 03/2026 भा.न्या. संहिता कलम 110, 223 सह पर्यावरण संरक्षण अधि, कलम 4, 5,15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार उपविभाग संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, डी. बी. पथकाचे पोउपनि छगन चव्हाण, भुनेश मराठे व डी. बी. पथक अशांनी केली आहे. "आगामी मकरसंक्रांत पतंगोत्सवात नागरीकांनी प्लॅस्टीक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासुन बनविलेल्या शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या धाग्याचा वापर करु नये. तसेच अशाप्रकारे नायलॉन मांजा विक्री व हाताळणी करतांना कोणी आढळुन आल्यास त्याबाबत तात्काळ जवळचे पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्ष येथे कळवावे, त्याअन्वये संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केले आहे."



