*सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात पोलीस स्थापना दिनानिमित्त निबंध स्पर्धा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात पोलीस स्थापना दिनानिमित्त निबंध स्पर्धा*
*सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात पोलीस स्थापना दिनानिमित्त निबंध स्पर्धा*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-पोलीस समाजात मित्र म्हणून वावरत असताना त्यांना कधीही मदतीसाठी हाक दिल्यास नक्कीचआपल्या मदतीला धावून येतील असे प्रतिपादन सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात पोलीस स्थापना दिनानिमित्त निबंध स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या हंसाबेन पाडवी, पर्यवेक्षक नगिन कोते, अनिल जावरे, योगेश्वर बुवा, पंकज मराठे, जयेश मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांनी मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की समाजातील प्रत्येक घटकांच्या संरक्षणासाठी पोलीस असून त्यांना आपले मित्र समजा महिलांसह कुणालाही समस्या उद्भवल्यास 112 क्रमांकावर डायल करा विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता आपल्या भविष्याचे ध्येय गाठण्यासाठी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. सार्वजनिक जीवनात कायद्यांचे तंतोतंत पालन करा, वाहतुकीचे नियम यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल जावरे यांनी तर सुत्रसंचालन पंकज मराठे व आभार पर्यवेक्षक नगिन कोते यांनी मानले.



