*कु यो.ई.म. माध्यमिक विद्यालय सरदारनगर ता. तळोदा जि. नंदूरबार येथे बालिकादिन साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कु यो.ई.म. माध्यमिक विद्यालय सरदारनगर ता. तळोदा जि. नंदूरबार येथे बालिकादिन साजरा*
*कु यो.ई.म. माध्यमिक विद्यालय सरदारनगर ता. तळोदा जि. नंदूरबार येथे बालिकादिन साजरा*
तळोदा(प्रतिनिधी):-कु यो. ई. म. माध्यमिक विद्यालय सरदारनगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री, भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका. 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस, बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी.डी मराठे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे, कार्यक्रमासाठी शाळेच्या विद्यार्थीनी यांनी सावित्रीबाई फुले यांची वेषभूषा केली होती. शाळेचे कलाशिक्षक एस. आर. पवार यांनी सावित्रीबाई फुले यांचे फलक लेखन सजावट केले होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालनः एस. आय. मगरे यांनी केले, या प्रसंगी शिक्षक भाषणातून के.एम. खैरनार, श्रीमती कलाल यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष विषयक गोष्टी सांगितल्या व आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनीनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून मराठे यांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार, कार्याची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक डी.एन. देवरे, आर. बी. पाटील, एस.जे. पावरा, शिक्षकेतर कर्मचारी एम.एच. पोटे, व्ही.एस. शिंदे, डी.एच. तडवी, यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी एस.एन. शिरसाठ यांनी आभार मानले सामुहिक राष्ट्रगीत घेऊन समारोप करण्यात आला.



