*वाटूळ येथील सोनारवाडी व तिवरे मार्गावरील स्ट्रीट लाईट चोरीला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वाटूळ येथील सोनारवाडी व तिवरे मार्गावरील स्ट्रीट लाईट चोरीला*
*वाटूळ येथील सोनारवाडी व तिवरे मार्गावरील स्ट्रीट लाईट चोरीला*
राजापूर(प्रतिनिधी):-वाटूळ गावातील सोनारवाडी तसेच तिवरे रस्त्यावरील विठ्ठल बाग परिसरात बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे हा प्रकार ग्रामपंचायत सदस्य ओंकार चव्हाण यांना या रस्त्यावरुन जाताना दोन पोल वरील स्ट्रीट लाईट गियब झाल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेनंतर संबंधित विभागात अंधार पसरल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे गावात वाघाचा संचार होत असल्याने शिवप्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावातील एक समाज कार्यकर्ते अमोल गजानन चव्हाण यांनी लाईट स्वखर्चाने बसविल्या होत्या. रात्रीच्या वेळी ये- जा करणाऱ्या नागरीकांना व वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघात व चोरीच्या घटनांचा धोका वाढला आहे. चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात राजापूर पोलिस स्टेशन येथे गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष बंधू चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे.



