*श्री कोंडवाडी हनुमान मंडळ संलग्न जय बजरंगबली कलापथक पन्हाळजे आयोजित जय बजरंगबली चषक 2025 उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्री कोंडवाडी हनुमान मंडळ संलग्न जय बजरंगबली कलापथक पन्हाळजे आयोजित जय बजरंगबली चषक 2025 उत्साहात संपन्न*
*श्री कोंडवाडी हनुमान मंडळ संलग्न जय बजरंगबली कलापथक पन्हाळजे आयोजित जय बजरंगबली चषक 2025 उत्साहात संपन्न*
दिवा(प्रतिनिधी):-श्री.कोंडवाडी हनुमान मंडळ संलग्न जय बजरंगबली कलापथक मु.पो. पन्हाळजे, कोंडवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरीआयोजित "जय बजरंग बली चषक 2025" यूट्यूब लाईव्ह भव्य टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवार 21 डिसेंबर 2025 रोजी भगवान पाटील क्रीडांगण सपरा मैदान, दातिवली दिवा (पूर्व), मुंबई येथे अगदी यशस्वीरित्या प्रतिवर्षी प्रमाणे निर्विवाद पणे संपन्न झाले, सदर स्पर्धेत खेड आणि दापोली तालुक्यातील अनेक गावातून वेगवेगळ्या वाडीतील एकूण 20 संघांनी सहभाग नोंदवला होता, सर्वांनी शिस्तप्रिय खेळी करत मंडळाला छान सहकार्य केले.
या नियोजनात श्री कोंडवाडी हनुमान मंडळाची संपूर्ण कार्यकारणी आणि सभासद मंडळी यांनी हजेरी लावली होती. तसेच पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते, मंडळाचे हितचिंतक आदी मान्यवर उपस्थित होते. "बजरंग बली चषक 2025" वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला काळकाई क्रिकेट संघ कर्जी, गवळवाडी तर राजवेल रायडर्स राजवेल कुणबीवाडी क्रिकेट संघ या संघाला उपविजेता पदावर समाधान मानावं लागलं अनुक्रमे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले ते नवनिर्माण क्रिकेट संघ होडखाड - दत्तवाडी
तसेच या स्पर्धेचे मालिकावीर म्हणून अजित धनावडे (कर्जी गवळवाडी संघ),उत्कृष्ट फलंदाज सिद्धार्थ येद्रे (कर्जी गवळवाडी संघ ) आणि उत्कृष्ट गोलंदाज जय निकम (राजवेल रायडर्स) खेळाडूंची निवड करण्यात आली. सदर स्पर्धेच उत्कृष्ट समालोचन सुदर्शन जाधव, दिगंबर भोवड यांनी केले तर स्पर्धेची उत्कृष्ट पंचगिरी श्र. निलेश धामणे, विजय यांनी केली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 20 संघाचे आणि खेळाडूंचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. सर्व खेळाडूंच्या मोलाच्या सहकार्याने आणि जय बजरंगबली कलापथकच्या पदाधिकारी,सभासद यांच्या मेहनतीने जय बजरंगबली चषक 2025 क्रिकेट स्पर्धा आनंदात संपन्न झाली.



