*मुंबई गोवा महामार्गासाठी आता जनआक्रोश समितीची संगमेश्वर येथे रास्तारोको आंदोलनाची हाक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुंबई गोवा महामार्गासाठी आता जनआक्रोश समितीची संगमेश्वर येथे रास्तारोको आंदोलनाची हाक*
*मुंबई गोवा महामार्गासाठी आता जनआक्रोश समितीची संगमेश्वर येथे रास्तारोको आंदोलनाची हाक*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-मुंबई–गोवा महामार्गाचे 17 वर्षे रखडलेले काम सततच्या डेडलाईनचा फसवा खेळ याचा निषेध करण्यासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या या डेडलाईन थांबल्याच पाहिजेत याच मागणीसाठी 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता संगमेश्वर डेपो येथे जनआक्रोश समितीच्या वतीने रास्तारोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. हा प्रत्येक कोकणी जनतेचा लढा आहे म्हणूनच या आंदोलनात स्थानिक नागरिक तसेच मुंबईकर चाकरमानी कोकणातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधीनी पक्षभेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी होऊन या आंदोलनाला सहकार्य करावे अशी विनंती जन आक्रोश समितीने केली आहे मुंबईतून येणाऱ्या सदस्यांनी ८६५२५०५५४२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.