*पंजाब मुख्यमंत्र्याच्या मातोश्री हरपालकौर मान यांची अप्सरा आईस क्रीम मॉलला सदिच्छा भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पंजाब मुख्यमंत्र्याच्या मातोश्री हरपालकौर मान यांची अप्सरा आईस क्रीम मॉलला सदिच्छा भेट*
*पंजाब मुख्यमंत्र्याच्या मातोश्री हरपालकौर मान यांची अप्सरा आईस क्रीम मॉलला सदिच्छा भेट*
नांदेड(प्रतिनिधी):-पंजाबचे मुख्यमंत्री सरदार भगवंतसिंघ मान यांच्या मातोश्री हरपालकौर जी मान यांनी नांदेड येथील अप्सरा आईस क्रीम मॉलला सदिच्छा भेट देऊन आईस क्रीम मॉलचे संचालक श्रेयसकुमार प्रफुल्ला पंढरीनाथ बोकारे यांना आशीर्वाद दिले. पंजाबचे मुख्यमंत्री सरदार भगवंतसिंघ मान यांचा संदेश घेऊन गुरुद्वारा दर्शनासाठी नांदेडला आलेल्या त्यांच्या मातोश्री श्रीमान हरपालकौर जी मान यांनी हजुर साहिबची यात्रा करून त्या काल स्टार एअर लाईनच्या विमानाने पंजाबकडे रवाना झाल्या. दरम्यान त्यांनी सचखंड गुरुद्वारा येथे नतमस्तक झाल्या. गुरुद्वारा लंगर साहिबचे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघजी व संत बाबा बलविंदरसिंघजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.
नानक साई फाऊंडेशनने मातोश्री हरपालकौर मान यांचे नांदेड रेल्वे स्टेशनवर जोरदार स्वागत केले. मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नंतर नांदेड येथे लॉन्च झालेल्या आणि अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या मुंबईच्या अप्सरा आईसक्रीम मॉलला सदिच्छा भेट दिली. अप्सरा आईस क्रीम मॉलचे संचालक श्रेयसकुमार प्रफुल्ला पंढरीनाथ बोकारे यांनी मातोश्रीचे स्वागत केले. यावेळी नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, शिवराज पाटील कळकेकर, सौ प्रफुल्ला बोकारे, सौ जयश्री देवसरकर, सौ अश्विनी देशमुख, डॉ जान्वी देवसरकर, धनंजय उमरीकर, आकाश जगताप, निलेश जगताप उपस्थित होते.



