*कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूलमध्ये भव्य डिस्ने कार्निव्हल उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूलमध्ये भव्य डिस्ने कार्निव्हल उत्साहात संपन्न*
*कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूलमध्ये भव्य डिस्ने कार्निव्हल उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण, सर्जनशीलता तसेच उद्योजकीय कौशल्यांना वाव देण्याच्या उद्देशाने भव्य डिस्ने कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले. रंगतदार वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी यांनी भूषविले, तर अशोक शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष व संचालक सिद्धार्थ वाणी, संचालिका सौ. उमा वाणी, संचालिका सौ. केतकी वाणी, संचालक सागर शहा, तसेच नंदुरबारचे नगरसेवक कुनाल वसावे, हिरालाल चौधरी, प्रेम सोनार आणि सौ. वैशाली राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या प्राचार्य डॉ. छाया शर्मा यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.
कार्निव्हलमध्ये 50 हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, विविध खेळ, मनोरंजनात्मक उपक्रम, राईड्स तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशील प्रदर्शनांचा समावेश होता. या उपक्रमाला 3000 हून अधिक पालक आणि 1200 विद्यार्थी उपस्थित राहून मनमुराद आनंद लुटला.
या कार्निव्हलमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होण्यास मोलाची मदत झाली. भविष्यातील यशस्वी उद्योजक घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. पालकांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. एकूणच, डिस्ने कार्निव्हल हा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी स्मरणीय व आनंददायी अनुभव ठरला.



