*पेंडखळे येथे गोठ्यात घुसून बिबट्याने केली दोन वासरांची शिकार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पेंडखळे येथे गोठ्यात घुसून बिबट्याने केली दोन वासरांची शिकार*
*पेंडखळे येथे गोठ्यात घुसून बिबट्याने केली दोन वासरांची शिकार*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे पेंडखळे गावातील भागवत स्टाॅप येथील शेतकरी मकरंद भागवत यांच्या गोठ्यात घुसून केलेल्या हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू झाला असून एक वासरु गंभीर जखमी केले आहे या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली असून या पिसाळलेल्या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्यात अलिकडे मानवी वस्त्यांत बिबट्यांचा वावर वाढला असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पेंडखळेतील मकरंद भागवत यांच्या वाड्यात बांधलेल्या वासरांवर हल्ला करत दोन वासरांना ठार केले तर एक गंभीर जखमी झाले आहे या घटनेनंतर पेंडखळे गावात खळबळ उडाली असून पाळीव जनावरांवर राजरोसपणे हल्ले करणाऱ्या रक्त पिपासू बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच डॉक्टरांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.



