*स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 साठी अर्ज करण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 साठी अर्ज करण्याचे आवाहन*
*स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 साठी अर्ज करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 साठी लेखक आणि प्रकाशकांकडून प्रवेशिका (अर्ज) मागवण्यात आल्या आहेत, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सचिवांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. पात्रता आणि कालावधी: प्रकाशन 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तकांची प्रथम आवृत्ती या स्पर्धेसाठी पात्र असेल. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दिनांक 1 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत प्रवेशिका व पुस्तके स्वीकारली जातील. विहित कालमर्यादेनंतर (30 जानेवारी 206) येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिका कुठे पाठवावी?
जिल्हे मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दिनांक 1 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 या विहित कालावधीत पाठवावे.
ऑनलाइन उपलब्धता स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळांवर विनामूल्य उपलब्ध आहेत. लेखक आणि प्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर/पाकीटावर “स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 साठी प्रवेशिका” असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे, असेही शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



