*ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाची सहकारी संस्थांना क्षेत्रभेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाची सहकारी संस्थांना क्षेत्रभेट*
*ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाची सहकारी संस्थांना क्षेत्रभेट*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीच्या सहकार विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, शेतकरी सहकारी संघ लिमिटेड नंदुरबार व जळगाव जनता सहकारी बँक लि.(शेड्युल्ड बँक) शाखा नंदुरबार येथे भेट दिली. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना शेतकरी संघ लिमिटेड नंदुरबार येथील व्यवस्थापक कृष्णा रंगराव पाटील यांनी शेतकरी संघाचे कार्य व उपयोगितेबद्दल विस्तृत अशी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली व त्यांच्या शंकेचे निरसन केले. तद्नंतर जळगाव जनता सहकारी बँक या ठिकाणी बँकेचे व्यवस्थापक पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना सहकारी बँकेविषयी व शेड्युल बँकेविषयी सर्व माहिती सांगितली व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष सुहास नटावटकर तसेच माजी प्राचार्या सुहासिनी नटावदकर यांनी शुभेच्छा दिल्या या क्षेत्रभेटी करता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच या क्षेत्रभेटीचे नियोजन व संयोजन सहकार विषयाचे प्रा. नितीन अन्नदाते, प्रा. सी.ए.कृष्णा गांधी, प्रा. मीनल वसावे यांनी केले.



