*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):–शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद (जि. नंदुरबार) येथे ‘वीर बाल दिवस’ मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या बालवीरांचे स्मरण व्हावे व विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी रॅली, स्लोगन स्पर्धा, योगा सत्र, भाषण (स्पीच) स्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात आले. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी वीर बालकांचे बलिदान, देशप्रेम व शौर्य दर्शविणारे संदेश असलेले फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. स्लोगन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून देशभक्तीपर विचार प्रभावीपणे मांडले.
योगा सत्राद्वारे विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले, तर भाषण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘वीर बाल दिवस’ाचे ऐतिहासिक महत्त्व, बालवीरांचे योगदान आणि आजच्या तरुणाईसाठी त्यातून मिळणारी प्रेरणा यावर विचार मांडले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पंकज एम. चौधरी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. संस्थेच्या अध्यक्षा योगिता गणेश पाटील व सचिव गणेश गोविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. तस्विता मगरे आणि प्रा पायल निकुंबे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, वीर बालकांच्या शौर्यापासून प्रेरणा घेऊन जीवनात कर्तव्यनिष्ठा, देशप्रेम आणि सामाजिक जबाबदारी जपण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय मूल्यांची जाणीव अधिक दृढ झाली असून ‘वीर बाल दिवस’ाचा उद्देश सार्थ ठरला, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.



