*लक्ष्मी ऑरगॅनिक्स कंपनी विरोधात कोकणवासीयांनी एकत्र यावे मनसे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांचे आव्हान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लक्ष्मी ऑरगॅनिक्स कंपनी विरोधात कोकणवासीयांनी एकत्र यावे मनसे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांचे आव्हान*
*लक्ष्मी ऑरगॅनिक्स कंपनी विरोधात कोकणवासीयांनी एकत्र यावे मनसे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांचे आव्हान*
खेड(प्रतिनिधी):-इटलीतील ज्या कंपनीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले होते, मानव जातीवर दुष्परिणाम झाले होते. तिची यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान आता रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी (खेड) मध्ये वापरले जात असल्याचे वृत्त समोर आले आहे. इटलीतील 'मिटेनी' (Miteni S.p.A) ही कंपनी प्रदूषणाच्या गंभीर आरोपांमुळे 2018 मध्ये बंद पडली होती. या कंपनीची मशिनरी आणि पेटंट्स भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स (Laxmi Organic Industries) च्या एका उपकंपनीने खरेदी केल्याचे सांगितले जाते. इटलीमध्ये या कंपनीने PFAS (Per- and polyfluoroalkyl substances) या रसायनांची निर्मिती केली होती. या रसायनांना 'फॉरेव्हर केमिकल्स' म्हणतात कारण ती निसर्गात कधीही नष्ट होत नाहीत. या केमिकलमुळे येणाऱ्या पिढीवर खूप परिणाम होईल आणि त्यांचे आयुर्मान केवळ 30 ते 40 वर्ष असू शकते. लोटे एमआयडीसी मधील अनेक कंपन्या ह्या केमिकल कंपन्या आहेत त्यामुळे तेथील नागरिकांवर आणि पर्यावरणावर परिमाण झाल्याचे दिसून आले आहे. लोटे परशुराम येथील 'लक्ष्मी ऑरगॅनिक्स'च्या प्रकल्पात (Yellowstone Fine Chemicals) या मशिनरीद्वारे उत्पादन सुरू झाल्याच्या बातम्या नोव्हेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. या रसायनांमुळे कर्करोग, यकृताचे आजार आणि हार्मोनल असंतुलन यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोकणातील पर्यावरणावर आणि लोकांच्या आरोग्यावर याचे परिणाम होऊ शकतात असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इटलीतील 'मिटेनी' (Miteni) ही कंपनी PFAS (Per- and polyfluoroalkyl substances) नावाच्या रसायनांचे उत्पादन करत होती.या रसायनांना 'फॉरेव्हर केमिकल्स' म्हणतात, कारण ती निसर्गात किंवा मानवी शरीरात कधीही पूर्णपणे नष्ट होत नाहीत.या कंपनीने इटलीतील 'व्हेनेटो' प्रांतातील सुमारे 3.5 लाख लोकांचे पिण्याचे पाणी दूषित केले होते. तिथल्या लोकांच्या रक्तामध्ये या विषारी रसायनांचे प्रमाण खूप जास्त आढळले असून त्याचा संबंध कर्करोग, वंध्यत्व आणि हृदयरोगाशी जोडला गेला आहे.भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स (Laxmi Organic Industries) ने 2019 मध्ये एका लिलावाद्वारे मिटेनी कंपनीची सर्व मशिनरी, तंत्रज्ञान आणि पेटंट्स खरेदी केले. लोटे परशुराम एमआयडीसी आधीच प्रदूषणाच्या समस्यांशी झुंजत आहे. या नवीन प्रकल्पामुळे वशिष्टी नदी आणि परिसरातील भूगर्भातील पाणी कायमचे दूषित होण्याची भीती पर्यावरणवादी व्यक्त करत आहेत. या प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेऊन आजुबाजूचा गावातील ग्रामस्थांनी आणि पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवला पाहिजे.ही रसायने मानवी शरीरातील रक्तामध्ये साठून राहतात यामुळे किडनी कॅन्सर, थायरॉईडचे आजार, गरोदर महिलांमध्ये समस्या आणि लहान मुलांच्या रोगप्रतिकार शक्तीवर गंभीर परिणाम होतात. परशूराम भूमी ही देवभूमी म्हणून ओळखले जाते आता ती विषारी भूमी बनत आहे. परशुराम भूमी वाचवण्यासाठी कोकणवासीयांनी आवाज उठवला पाहिजे असे आवाहन मनसे माजी तालुकाध्यक्ष आणि समाजसेवक संदीप फडकले यांनी केले आहे.



