*जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबिर दिमाखात उद्घाटन श्रम, संस्कार व सेवाभावातून सशक्त नागरिक घडविण्याचा संकल्प*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबिर दिमाखात उद्घाटन श्रम, संस्कार व सेवाभावातून सशक्त नागरिक घडविण्याचा संकल्प*
*जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबिर दिमाखात उद्घाटन श्रम, संस्कार व सेवाभावातून सशक्त नागरिक घडविण्याचा संकल्प*
नंदुरबार(प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, श्रमसंस्कृती व सेवाभाव रुजविणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन नंदुरबार येथील जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने टोकरतलाव शिवारातील आदिवासी अकादमी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याचा ठाम संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक म्हणून कार्य करताना मिळालेल्या अनुभवांचे स्मरण करून दिले.“राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक उपक्रम नसून ती जीवन घडविणारी चळवळ आहे. श्रमदान, स्वच्छता, सामाजिक जाणीव व संघभावनेतून विद्यार्थी जीवनाला दिशा मिळते. या शिबिरातून मिळणारे अनुभव आयुष्यभर उपयोगी पडणारी शिदोरी ठरतात,” असे प्रतिपादन त्यांनी केले. स्वयंसेवकांनी या संधीचे सोने करून स्वतःचा व महाविद्यालयाचा लौकिक वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभाग सातत्याने समाजोपयोगी, विधायक व राष्ट्रउभारणीच्या उपक्रमात अग्रस्थानी राहिला असल्याचे नमूद केले. “अशा विशेष शिबिरांच्या माध्यमातून शिस्त, संस्कार, सामाजिक जबाबदारी व राष्ट्रप्रेम ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविली जातात. खऱ्या अर्थाने या उपक्रमातून भारताचा भावी सशक्त, सुसंस्कृत व शीलवान नागरिक घडतो,” असे त्यांनी सांगितले. शिबिरातील प्रत्येक उपक्रमातून स्वयंसेवकांनी व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
प्रमुख अतिथी संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी यांनी विविध उदाहरणे व दृष्टांतांच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबिर हे स्वयंसेवकांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी व्यासपीठ असल्याचे स्पष्ट केले. “सेवाभावा सोबतच नेतृत्वगुण, संघटन कौशल्य व आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा मंच महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वयंसेवकांनी प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा,” असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी आदिवासी अकादमी येथील प्रा. स्मिता देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. शिबिराच्या कालावधीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने, श्रमदान, स्वच्छता व आरोग्यविषयक उपक्रम, तसेच समाजजागृती व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. जे. साक्रीकर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व प्रभावी सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज शेवाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एस. एस. दुतोंडे यांनी मानले. प्रा. अंकुश रघुवंशी व डॉ.डी.डी. गावित यांचे सहकार्य लाभले. या विशेष हिवाळी शिबिराच्या यशस्वी संयोजनासाठी प्रा. सी. के. गिरासे, प्रा. पी. सी. भील, प्रा. एस. आर. पाटील तसेच जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.



