*बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी आकाश भलकारे ची निवड, राष्ट्रीय स्पर्धेत एम एल पटेल इंग्लिश स्कूल चा खेळाडूं आकाश भलकारे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी आकाश भलकारे ची निवड, राष्ट्रीय स्पर्धेत एम एल पटेल इंग्लिश स्कूल चा खेळाडूं आकाश भलकारे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व*
*बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी आकाश भलकारे ची निवड, राष्ट्रीय स्पर्धेत एम एल पटेल इंग्लिश स्कूल चा खेळाडूं आकाश भलकारे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नुकत्याच पुणे इंदापूर येथे राष्ट्रीय अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन
कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व पुणे डिस्ट्रिक्ट कुराश असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ट व ज्युनियर्स मुले/ मुली राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा व बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच नोव्हेंबर महिन्यात पुणे इंदापूर येथील शहा सांस्कृतिक हॉल मध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत नंदुरबार येथील एम. एल. पटेल इंग्लिश मिडीयम स्कूलचा खेळाडूं 40 ते 45 किलो वजन गटात आकाश मोहन भलकारे याने राज्यस्तरीय स्पर्धेत विरोधकांचे गुडघे टेकवून अंतिम फेरीत सुवर्ण पदक जिंकले व नंदुरबार जिल्ह्याचे नाव लौकिक केले. त्याच्या चमकदार कामगिरी बद्दल सरदार वल्लभ पटेल संचलित एम.एल. पटेल संस्थेचे चेअरमन ॲड. सुरेश गोविंद पाटील व ॲड प्रभाकर पाटील यांनी खेळाडू आकाश भलकारे चे अभिनंदन शाल व पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी एम. एल.पटेल इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक संदीप चौधरी क्रीडा शिक्षक गणेश मराठे आदी उपस्थित होते. दिनांक 6 ते 8 जानेवारी रोजी बिहार (पटना) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करेल राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल खेळाडू आकाश मोहन भलकारेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.