ताजा खबरे:
*वसंतराव नाईक महाविद्यालयात आंतरविद्याशाखीय एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न*
*आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धेत कळसवली ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम
*सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या सिद्धी चाळके यांची लखनौ येथे होणाऱ्या आंतरराज्यीय युवा विनिमय कार्यक्रमासाठी निवड*
*नंदुरबार येथील एस ए चर्च मार्फत नाताळनिमित्त झालेल्या सामूहिक प्रार्थना*
*लाखापुर फॉरेस्ट माध्यमिक विद्यालयाचा मुंबई नेहरू सायन्स सेंटर व मुंबई दर्शन अभ्यासदौरा उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*वसंतराव नाईक महाविद्यालयात आंतरविद्याशाखीय एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*वसंतराव नाईक महाविद्यालयात आंतरविद्याशाखीय एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न*

  • Share:

*वसंतराव नाईक महाविद्यालयात आंतरविद्याशाखीय एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न*
शहादा(प्रतिनिधी):-येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष (आय.क्यु.ए.सी.) व भौतिकशास्त्र विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव; प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम.उषा), शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली; यांच्या अंतर्गत “रिसेंट इंटरडिसीप्लीनरी अॅप्रोचेस इन सायन्स, ह्युम्यानीटीज, अग्रीकल्चर, इंजिनीअरिंग, लॉ आणि म्यानेजमेंट” या विषयावर एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन 24 डिसेंबर 2025 बुधवार रोजी करण्यात आले होते. प्रारंभी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, आमचे आधारवड कर्मसाक्षी पूज्य कै. नानासाहेब जाधव, खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी, व संस्थेचे प्रेरणास्थान वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन व द्वीपप्रज्वलन करून राष्ट्रीय परिषदेची मांगलिक सुरुवात झाली. या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटक म्हणून शास्त्रज्ञ- नॅनोटेक्नॉलॉजी, माजी प्राचार्य प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील प्रो. डॉ. एल. ए. पाटील व प्रोफेसर डॉ. आर. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंचावरिल सर्व मान्यवर उपस्थित होते देशातील 401 प्राध्यापक व संशोधक व विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय परिषदेत नोंदणी केली. या परिषदेत उद्घाटनपर संबोधनात  सायन्स व टेकनॉलॉजीचे प्रमुख प्रो. डॉ. आर. एस. पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 याची सांगड विविध आंतरविद्याशाखीय विषयांशी घालून बदलत्या परिस्थितीत नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी संशोधक यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहे. याविषयी सविस्तर अशी माहिती दिली. आपल्याकडे जर कौशल्य असेल तर आपल्याला रोजगारापासून कोणीही थांबवू शकत नाही                                                                                                           असा संदेश दिला. याप्रसंगी सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ. वर्षा जाधव, कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशु जाधव, समन्वयक संजय राजपुत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील उपस्थीत होते. या एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संजय जाधव म्हणाले की यापरिषदेचा मुख्य उद्देश विविध विद्याशाखांचे समन्वय यातुन सर्वाना नविनवाटा गवसून शिक्षणाचा स्तर अजुन उंचावण्यास मदत होऊ शकते म्हणुन नविन शैक्षणिक धोरणांची जाणीव सर्वाना व्हावी याउद्देशाने हि परिषद आयोजित करून यातुनच नविन तथ्य गवसणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
राष्ट्रीय परिषदेत अनेक विषय तज्ञानी मार्गदर्शन केले. यात प्रारंभी प्रथम सत्रात कबचौ उमवि, जळगाव, सायन्स व टेकनॉलॉजीचे माजी प्रमुख प्रोफेसर डॉ. आर. एस. पाटील यांनी ‘नवीन शिक्षण धोरणातील प्रवाह आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन’ या विषयाच्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांसह संस्था व समाजाचाही मोठा वाटा राहणार आहे, असा संदेश दिला. याच मालिकेतील दुसऱ्या सत्रात प्रो. डॉ. एल. ए. पाटील यांनी ‘हिग्स बोसॉनचा अद्भुत शोध या विषयावर मार्गदर्शन करत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कला कृषी विधी व्यवस्थापन विविध विद्याशाखांशी कसा सहसंबंध आहे हे समजून दिले व जगाची अस्वस्थता घालवण्यासाठी अध्यात्मासह विज्ञानाचाही आधार घ्यावा लागणार आहे. यांच्या समन्वयातून माणसाची व एकुणच जगाची अस्वस्थता दूर होण्यास मदत होऊन विज्ञानाच्या जगात मानवाला जगता आले पाहिजे याविषयी संदेश विद्यार्थ्यांना दिला. तृतीय सत्रात माजी संचालक, महात्मा गांधी ग्रामीण अध्ययन विभागाचे प्रमुख, वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत येथील प्रा. डॉ. व्ही. ए. सोमानी यांनी ‘शाश्वत विकास: भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य’ यावर मार्गदर्शन करतांना शाश्वत विकास याची गरज का आहे हे सांगत शाश्वत विकास हे एकच ध्येय आपले असावे असे स्पष्ट केले. चतुर्थ सत्रांत माजी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.परवेज अहमद अब्बासी, व्ही.एन.एस.जी. विद्यापीठ, सुरत  यांनी “हुंडा, विवाह, मेजवानी, सत्ता समीकरणे” या विषयावर मार्गदर्शन करत प्राचीन काळातील समाज व्यवस्था कशी निर्माण झाली व सामाजिक विषमतेवर भर देत सर्व जग हे एक आहे असा संदेश देत समाजव्यवस्था टिकून कशी राहील यासंबंधीचा संदेश दिला. दुपारच्या सत्रांत माजी व्यवस्थापन परिषद सदस्य, कबचौउमवि, जळगाव डॉ. नितीन यू. बारी, सिनेट आणि व्यवस्थापन परिषद सदस्य, कबचौउमवि, जळगाव येथील प्रा. डॉ. शिवाजीराव बी. पाटील, राज्यशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य डॉ. अनिल के. साळुंके, ग्रंथालय अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. पी. पी. डांगे यांनी आपापल्या विषयावर आंतरविद्याशाखीय संबंध व नविन संशोधन यावर माहिती दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड यांनी या राष्ट्रीय परिषदेमागील हेतू साध्य झाल्याने मनस्वी समाधान व्यक्त केले. आयक्यूएसी चे समन्वयक व परिषदेचे संयोजक डॉ. बी. वाय. बागुल यांनी परिषदेची प्रस्तावना करत राष्ट्रीय परिषदेचा विषय निवड व उपयुक्ततेवर प्रकाश टाकला व परिषदेचे सचिव डॉ. डी. वाय. पाटील यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. या राष्ट्रीय परिषदेचे सुत्रसंचालन डॉ. एस. एम. पाटील व प्रा. एन. एम. साळुंके यांनी केले तर आभार डॉ. के. एल. पाटील यांनी मानले. या संपूर्ण परिषदेचे तांत्रिक संचालन डॉ.एस. एस. ईशी यांनी केले तर राष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी व प्राध्यापकेतर बंधू  यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*वसंतराव नाईक महाविद्यालयात आंतरविद्याशाखीय एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न*
December, 26 2025
*आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धेत कळसवली ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम
December, 26 2025
*सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या सिद्धी चाळके यांची लखनौ येथे होणाऱ्या आंतरराज्यीय युवा विनिमय कार्यक्रमासाठी निवड*
December, 26 2025
*नंदुरबार येथील एस ए चर्च मार्फत नाताळनिमित्त झालेल्या सामूहिक प्रार्थना*
December, 25 2025
*लाखापुर फॉरेस्ट माध्यमिक विद्यालयाचा मुंबई नेहरू सायन्स सेंटर व मुंबई दर्शन अभ्यासदौरा उत्साहात संपन्न*
December, 25 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज