*सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या सिद्धी चाळके यांची लखनौ येथे होणाऱ्या आंतरराज्यीय युवा विनिमय कार्यक्रमासाठी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या सिद्धी चाळके यांची लखनौ येथे होणाऱ्या आंतरराज्यीय युवा विनिमय कार्यक्रमासाठी निवड*
*सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या सिद्धी चाळके यांची लखनौ येथे होणाऱ्या आंतरराज्यीय युवा विनिमय कार्यक्रमासाठी निवड*
खेड(प्रतिनिधी):-खेड तालुक्यातील शिवतेज आरोग्य संस्थेच्या सिद्धयोग विधी महाविद्यालय, खेड येथील विद्यार्थिनी कु. सिद्धी चाळके यांची भारत सरकारच्या मेरा युवा भारत (My Bharat) उपक्रमांतर्गत आयोजित आंतरराज्यीय युवा विनिमय कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ येथे होणाऱ्या या आठ दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमासाठी त्या नुकत्याच रवाना झाल्या आहेत. कु. सिद्धी चाळके यांची निवड शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग, नेतृत्वगुण, सांस्कृतिक जाणीव तसेच युवकांमध्ये जनजागृतीसाठी केलेल्या विविध उपक्रमांचा सखोल आढावा घेऊन करण्यात आली आहे. भारत सरकारच्या केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘मेरा युवा भारत’ उपक्रमांतर्गत दरवर्षी देशातील विविध राज्यांतील युवकांसाठी आंतरराज्यीय युवा विनिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश युवकांचा सर्वांगीण विकास घडवणे, राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे तसेच विविध राज्यांच्या संस्कृती, भाषा व जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे. या आठ दिवसीय कार्यक्रमात कार्यशिबिरे व श्रमदान, संबंधित राज्याची भाषा शिकणे, सांस्कृतिक देवाणघेवाण व सादरीकरण, पारंपरिक अन्न तयार करणे व सामायिक करणे, पोशाख परेड, स्थानिक खेळ, योग, स्वच्छता मोहीम, निबंध व वादविवाद स्पर्धा, क्षेत्रभेटी, पदयात्रा, प्रभातफेरी तसेच स्थानिक कुटुंबे, युवा क्लब व युवकांशी थेट संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कु. सिद्धी चाळके यांच्या या निवडीबद्दल सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या यशासाठी संस्थेने आवश्यक ते सर्व सहकार्य व मार्गदर्शन दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे कु. सिद्धी चाळके यांना उत्तर प्रदेशातील संस्कृती, भाषा व जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून त्यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे.



