*लाखापुर फॉरेस्ट माध्यमिक विद्यालयाचा मुंबई नेहरू सायन्स सेंटर व मुंबई दर्शन अभ्यासदौरा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापुर फॉरेस्ट माध्यमिक विद्यालयाचा मुंबई नेहरू सायन्स सेंटर व मुंबई दर्शन अभ्यासदौरा उत्साहात संपन्न*
*लाखापुर फॉरेस्ट माध्यमिक विद्यालयाचा मुंबई नेहरू सायन्स सेंटर व मुंबई दर्शन अभ्यासदौरा उत्साहात संपन्न*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयाचा शैक्षणिक अभ्यास दौरा नुकताच मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मुंबई येथील नेहरू सायन्स सेंटरला भेट देत ज्ञानवर्धक अभ्यास दौरा पूर्ण केला. मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग, वैज्ञानिकांचे आत्मचरित्र, महत्त्वपूर्ण शोध, कल्पनाविस्तार करणारी मॉडेल्स, जादुई किमया तसेच वैज्ञानिक शो अनुभवले. या भेटीतून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी, संशोधनाची आवड व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला. यानंतर विद्यार्थ्यांनी मुंबई दर्शनाचा अविस्मरणीय अनुभव घेतला. यामध्ये नेहरू तारांगण, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, लीलावती हॉस्पिटल, नाणे संग्रहालय, मंत्रालय, विधान भवन, आझाद मैदान, वानखेडे आंतरराष्ट्रीय स्टेडियम, एअर इंडिया बिल्डिंग, भारतीय जीवन विमा निगम मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जहांगीर आर्ट गॅलरी, गेटवे ऑफ इंडिया, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर,स्वामीनारायण मंदिर, समुद्री सफारी, बोटिंग, चर्चगेट, वरळी– बांद्रा राजीव गांधी सागरी सेतू, आर. के. स्टुडिओ, मेट्रो स्टेशन, कोस्टल रोड आदी ठिकाणांचा समावेश होता. या अभ्यास दौर्याचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच रेल्वेच्या स्लीपर एसी कोचने प्रवास करत अविस्मरणीय आनंद लुटला. या सहलीत इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मुंबई दर्शनासह विद्यार्थ्यांना नंदुरबार येथील प्रशस्त सीबी गार्डन तसेच वाणिज्य व्यवहारांची माहिती मिळावी म्हणून डी- मार्टला भेट देण्यात आली. सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शिस्त, संयम व उत्साहाचे दर्शन घडवले. संपूर्ण सहल सुखरूप व यशस्वीरीत्या पार पडली असून मार्गदर्शनासाठी अनुभवी गाईडची नेमणूक करण्यात आली होती. या शैक्षणिक सहल अभ्यास दौर्याच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील, विनोद राणे, मंगल पावरा, चांदो पाडवी, फिरोजअली सय्यद, अश्विनी पाटील, अनिल भामरे, सागर पाडवी आदी शिक्षक व सहकाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
एकूणच हा शैक्षणिक अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व आयुष्यभर स्मरणात राहणारा अनुभव ठरला.



