*ग्रामपंचायत भुजगाव येथे राष्ट्रीय पेसा दिवस उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ग्रामपंचायत भुजगाव येथे राष्ट्रीय पेसा दिवस उत्साहात साजरा*
*ग्रामपंचायत भुजगाव येथे राष्ट्रीय पेसा दिवस उत्साहात साजरा*
धडगाव(प्रतिनिधी):-भुजगाव ता. अक्राणी जि. नंदुरबार ग्रुप ग्रामपंचायत भुजगाव येथे राष्ट्रीय पेसा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी कुलदैवत याहा मोगी माता धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद शाळा हरणखुरी व जिल्हा परिषद शाळा भुजगाव येथील विद्यार्थ्यांनी स्वागतपर सुंदर नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
कार्यक्रमास ग्रामपंचायत परिसरातील सर्व अंगणवाडी सेविका, आशाताई, शिक्षकवर्ग, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना पेसा दिनाचे महत्त्व व ग्रामसभेचे अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद शाळा भुजगाव येथील मुख्याध्यापक सुभाष पावरा सहशिक्षक अर्चना राठोड तसेच जिल्हा परिषद शाळा हरणखुरी येथील मुख्यध्यापिका बेबी सूर्यवंशी व सहशिक्षिका ज्योती पावरा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
राष्ट्रीय पेसा दिनाचे औचित्य साधत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात जिल्हा परिषद शाळा हरणखुरी व भुजगाव येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध दुकानं लावली होती. या दुकानांतून उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी खरेदी केली. विद्यार्थ्यांना बाजारपेठेचे व्यवहार समजावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच अर्जुन पावरा होते. हरणखुरी गावातील ज्येष्ठ नागरिक ठुमला पावरा यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत भुजगावचे ग्रामविकास अधिकारी मोहनलाल वळवी यांनी पेसा दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. तर सरपंच अर्जुन पावरा यांनी पेसा कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. ग्रामस्थ राकेश पावरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षकवर्ग व ग्रामस्थांनी सहकार्य केले. राष्ट्रीय पेसा दिनानिमित्त ग्रामपंचायत परिसरात गावात जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले. रविंद्र पावरा ग्रामस्थ
राष्ट्रीय पेसा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना पेसा कायद्याची उपयुक्त माहिती मिळाली. ग्रामसभेचे अधिकार, स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत होण्यासाठी पेसा कायद्याचे महत्त्व याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांना झाली. बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळाल्याने हा उपक्रम विशेष कौतुकास्पद असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.



